19 September 2020

News Flash

दुहेरी यातना; सामूहिक बलात्कारानंतर १४ वर्षांच्या मुलीवर पुन्हा अत्याचार

छिंदवाडा येथे राहणारी १४ वर्षांची मुलगी ६ जुलै रोजी घरातून निघाली होती. ती रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.

संग्रहित छायाचित्र

मध्य प्रदेशमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून १४ वर्षांच्या मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. तिथून सुटका झाल्यावर घरी परतणाऱ्या पीडित मुलीचे पुन्हा अपहरण करुन आणखी तीन जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

छिंदवाडा येथे राहणारी १४ वर्षांची मुलगी ६ जुलै रोजी घरातून निघाली होती. ती रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी तिचा शोध देखील सुरु केला. पीडित मुलगी ८ जुलै रोजी महुआ टोला या भागात सापडली. तिला मानसिक धक्का बसला होता. ती तिथे कशी पोहोचली हे तिला देखील नीट आठवत नव्हते.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मोहित भारद्वाज (वय २२) या तरुणाने पीडित मुलीला बाईकवरुन घरी सोडतो, असे सांगितले. यानंतर मोहितने तिला राहुल भोंदे (वय २४) या मित्राच्या घरी नेले. तिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. काही तासांनी दोघांनी तिची सुटका केली. तिथून चालत घरी परतत असताना पीडित मुलीला मोहितच्या तीन मित्रांनी तिला गाठले. त्यांनी पुन्हा पीडितेला राहुलच्या घरी नेले. तिथे पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी मोहित, राहुलसह बंटी भालवी (लय २३), अंकित रघुवंशी (वय २५) आणि अमित विश्वकर्मा (वय २१) अशा पाच जणांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:42 am

Web Title: madhya pradesh 14 year old gangraped twice in chhindwara
Next Stories
1 टोयोटाने २६२८ इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर परत मागवल्या
2 ‘Forwarded message’ लगेच समजणार, व्हॉट्स अॅपचं नवं फीचर
3 मुंबई पाण्यात बुडाली, पण सरकार काहीच करत नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारले
Just Now!
X