23 November 2020

News Flash

धक्कादायक! हताश बलात्कार पीडितेनं पिशवीत गर्भ घेऊन पोलिसांकडे मागितली दाद

मध्य प्रदेशमधील सतना येथे राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर गावातील एका नराधमाने चाकूचा दाखवून बलात्कार केला. पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करुन

(प्रतिकात्मक छायाचित्र )

सात महिन्यांपूर्वी तिच्यावर चाकूचा धाक दाखवून बलात्कार झाला…. नराधमांविरोधात तिने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला…पण पोलीस दाद देईना…याच दरम्यान ती गर्भवती असल्याचे समोर आले… शेवटी त्या नराधमांनी पीडितेचा गर्भपात केला..मात्र, यानंतर पीडितेने जे पाऊल उचलले ते यंत्रणेची झोप उडवण्यासाठी पुरेसे होते. गर्भपातानंतर पीडित मुलगी पिशवीत गर्भ घेऊन थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचली. यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्य प्रदेशमधील सतना येथे राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर गावातील एका नराधमाने चाकूचा दाखवून बलात्कार केला. पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात पीडितेला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले.

बुधवारी पीडित मुलगी रुग्णालयात जात असताना बलात्कार करणारा नराधम व त्याच्या साथीदारांनी त्यांना गाठले. पीडितेला बळजबरीने एका डॉक्टरकडे नेण्यात आले. तिथे तिचा गर्भपात करण्यात आला. डॉक्टरने गर्भ एका पिशवीत टाकून मुलीकडे दिला. ही पिशवी गटारात फेकून दे, असे त्याने सांगितले होते.

पीडितेने शेवटी पिशवी घेऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. पोलिसांनी आरोपी नीरज पांडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘पीडित मुलगी कार्यालयात आली त्यावेळी मी तिथे नव्हतो. पण आम्ही गुन्हा दाखल केला आहे’, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 2:53 pm

Web Title: madhya pradesh 16 year old rape victim walked into sp office in satna with foetus in bag to register complaint
Next Stories
1 सलमान ‘शिक्षा’ पायो ! जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा
2 एक दिवसाचा पोलीस आयुक्त, पोलिसांनी पूर्ण केली कॅन्सरग्रस्त चिमुरड्याची इच्छा
3 पुनमचंद बिष्णोईंची लघुशंका सलमानला पडली महागात
Just Now!
X