21 September 2020

News Flash

‘मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसची पाकिस्तानबरोबर हातमिळवणी’

सर्जिकल स्ट्राइकदरम्यान काँग्रेस नेत्यांनी आपल्या लष्करप्रमुखांना गुंडाची उपमा दिली होती.

केंद्रीय मंत्री उमा भारती. (संग्रहित)

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगला आहे. यादरम्यान, भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पाकिस्तानशी हातमिळवणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे.

दमोह येथील निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सर्जिकल स्ट्राइकदरम्यान काँग्रेस नेत्यांनी आपल्या लष्करप्रमुखांना गुंडाची उपमा दिली होती. काँग्रेसचे नेते पाकिस्तानला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याचा कट रचला आहे.

यावेळी उमा भारती यांनी काँग्रेसशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही हल्लाबोल केला. अखिलेश हे आपल्या पित्याच्या कमाईवर जगत आहेत. सर्वाधिक भेदभावाचे राजकारण अखिलेश करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दमोह मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले धर्मेंद्र लोधी यांच्या प्रचारासाठी उमा भारती तिथे आल्या होत्या. त्याच्या एक दिवस आधी अखिलेश यादव दमोह येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजपा सर्वाधिक भेदभाव करणारा पक्ष असल्याची टीका केली होती. ते ताजमहलमध्ये पूजा करून घेतात आणि शहरांची नावे बदण्याचे काम करतात, असे म्हटले होते. दुसरीकडे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना समोरासमोर येण्याचा आव्हान दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 2:03 pm

Web Title: madhya pradesh assembly election 2018 uma bharti slams on congress on surgical strike comment
Next Stories
1 Video: भाजपा उमेदवाराच्या गळ्यात चपलेचा हार
2 ‘निसान’ मोटर्सच्या संचालकांना अटक
3 सभा न घेण्यासाठी काँग्रेसकडून २५ लाखांची ऑफर: ओवेसी
Just Now!
X