भाजपाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा आपला जाहिरनामा आज प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने या जाहीरनाम्याला ‘दृष्टीपत्र’ असे नाव दिले असून विद्यार्थ्यांना फ्री स्कूटी देणार असल्याचे आश्वासन यात दिले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी दहा लाख नोकऱ्या आणि घरे देण्याचे अश्वासनही दिले आहे. जनतेशी संवाद साधल्यानंतर आम्ही आमचे ‘दृष्टीपत्र’ तयार केले आहे. कृषि समृद्धी योजनेचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे शिवराज म्हणाले.

मागील १५ वर्षात मध्य प्रदेशमध्ये खूप विकास झाला आहे. निःशुल्क शिक्षण, स्वस्त धान्य आणि स्वस्त वीज देण्याचा आमच्या सरकारने प्रयत्न केला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रथमिक गरजा पुर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले.

 काय आहे जाहिरनाम्यात?

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे टाकले जातील
नर्मदा एक्स्प्रेस वे
चंबल एक्स्प्रेस वे
ग्वालियर, जबलपूरमध्ये मेट्रो
१० लाख रोजगार निर्माण
आयटीत पाच वर्षात पाच हजार कोटींची गुंतवणूक
कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग