22 October 2020

News Flash

कमलनाथ यांच्याविरोधात मध्य प्रदेश भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दोन तास मौन बाळगणार

प्रतिकात्मक छायाचित्र

मध्य प्रदेशमध्ये सध्या कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरतीदेवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून, जोरदार राजकीय रणकंदन सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत कमलनाथ यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. शिवाय, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे उद्या दोन तासांसाठी मौन देखील बाळगणार आहेत.

मध्य प्रदेश भाजपाने निवडणूक आयोगाकडे माजी मुख्यमंत्री व कमलनाथ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरतीदेवी यांना ‘आयटम’ संबोधल्याने भाजपाने यावर आक्षेप घेत तक्रार आयोगाकडे तक्रार केली आहे.

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरतीदेवी यांना आयटम म्हटल्याच्या निषेधार्थ, मी उद्या सकाळी १० ते दुपारी १२ हे दोन तास मौन बाळगणार आहे. त्यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याची लाज वाटायला हवी, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

मध्य प्रदेशच्या डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणा दरम्यान म्हटले होते की, ”सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत. हे तिच्या सारखे नाही? काय तिचे नाव? मी काय तिचे नाव घेऊ तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्याप्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला अगोदरच सावध करायला हवं होतं, ‘ही काय आइटम आहे’.”

कमलनाथ यांच्यावर शिवराज सिंह भडकले –
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “कमलनाथ जी! इमरतीदेवी त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे, ज्यांनी गावात मजुरी करण्यापासून सुरूवात केली व आज लोकप्रतिनिधीच्या रुपात राष्ट्र निर्माणात मदत करत आहे. काँग्रेसने मला ‘भूखा-नंगा’ म्हटलं आणि एक महिलेसाठी ‘आइटम’ सारख्या शब्दाचा वापर करून आपली विचारसरणी दर्शवली.”

इमरती देवी, त्या माजी आमदारांपैकी एक आहे. ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे. इमरतीदेवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 7:59 pm

Web Title: madhya pradesh bjp submits complaint to election commission against congress leader kamal nath msr 87
Next Stories
1 आयएनएस चेन्नईवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; नौदलाला आता दूरवर साधता येणार निशाणा
2 कमलनाथ यांची जीभ घसरली, भाजपा उमेदवारास म्हटले ‘आयटम’!
3 देशात सामूहिक संसर्ग झालाय, पण…; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच केला खुलासा
Just Now!
X