News Flash

प्रेम सिद्ध करण्यासाठी भाजपा नेत्याने प्रेयसीच्या घरातच झाडून घेतली गोळी

प्रेयसीच्या वडिलांनी प्रेम सिद्ध करण्यासाठी मला स्वत:वर गोळी झाडण्यास सांगितले होते. मी जिवंत राहिलो तर ते माझे लग्न लावून देणार होते

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रेम सिद्ध करण्यासाठी मध्य प्रदेशमधील भाजपा युवा मोर्चाच्या नेत्याने प्रेयसीच्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अतूल लोखंडे असे या तरुणाचे नाव असून तो भारतीय जनता युवा मोर्चाचा अरेरा मंडळाचा उपाध्यक्ष आहे.

अतूल लोखंडेचे एका तरुणीवर प्रेम होते. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अतूल भोपाळमध्ये प्रेयसीच्या घरी गेला. तिथे त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. घटनेच्या वेळी अतूलचे काका खाली कारजवळ थांबले होते. गोळीबाराचा ऐकून त्यांनी घराकडे धाव घेतली. त्यांनीच अतूलला रुग्णालयात दाखल केले. अतूल यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले असून अजूनही ते व्हेंटिलेटरवर आहेत.

अतूल लोखंडेने घटनेपूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट टाकली होती. प्रेयसीच्या वडिलांनी प्रेम सिद्ध करण्यासाठी मला स्वत:वर गोळी झाडण्यास सांगितले होते. मी जिवंत राहिलो तर ते माझे लग्न लावून देणार होते आणि माझा मृत्यू झाला तर पुढील जन्मी मी त्या तरुणीशी लग्न करेन, असे त्याने म्हटले आहे. माझ्या पश्चात लहान भावंडांनी आई- वडिलांची काळजी घ्यावी, असे त्याने नमूद केले आहे. ज्या तरुणीवर मी प्रेम केले तिच्याशिवाय जगणे निरर्थक आहे. माझ्या या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. अतूलने पोस्टमध्ये त्या तरुणीसोबतचे छायाचित्र देखील शेअर केले आहे.

अतूलचे गेल्या १३ वर्षांपासून एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. ती तरुणी बँक कर्मचारी आहे. अतूलने काही दिवसांपूर्वी तरुणीच्या वडिलांची भेट घेतली होती. त्यांनी लग्नास नकार दिल्यावर अतूलने तिच्या वडिलांना धमकावलेदेखील होते. या प्रकाराने त्या तरुणीने अतूलशी संबंध तोडले होते. अतूलने आत्महत्येचा प्रयत्न करताच पोलिसांनी तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 4:47 pm

Web Title: madhya pradesh bjps youth wing leader shot himself at girlfriends house in bhopal to prove love
Next Stories
1 यूपीत आरएसएसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
2 मोदी सरकारची निवडणूकपूर्व पेरणी, १४ पिकांच्या हमीभावात भरघोस वाढ
3 झाकीर नाईकचे प्रत्यार्पण : मलेशियातील सत्तांतर भारताच्या पथ्यावर
Just Now!
X