News Flash

मध्यप्रदेश : दिवाळीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय; चिनी, परदेशी फटाक्यांवर बंदी

वापर केल्या कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश

मध्यप्रदेश सरकारनं दिवाळीपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात चिनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. “चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीवर विना परवाना पूर्णपणे बंदी आहे. डायरेक्ट जनरल फॉरेन ट्रेडद्वारे चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीसाठी कोणतेही परवाने देण्यात आले नाहीत,” असं मध्यप्रदेश सरकारनं स्पष्ट केलं आहे.

मध्यप्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजौर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसंच या फटाक्यांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच कायद्याचं उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी यासंदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये चिनी फटाके आणि त्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्य़ाचा निर्णय घेण्यात आला. तसंच त्याचा वापर केल्यास संबंधितांवर ‘एक्स्प्लोसिव्ह अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरंदी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. तसंच दिवाळीदरम्यान मातीच्या पणत्यांची खरेदी करावी जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 8:19 am

Web Title: madhya pradesh cm shivraj singh chauhan bans sale and storage of chinese crackers in state jud 87
Next Stories
1 US Election : ट्रम्प यांच्या विजयाच्या दाव्यावर बायडेन यांचा निशाणा; म्हणाले, “जनता…”
2 अमेरिकेचे अध्यक्षपद अजूनही अधांतरी!
3 टीआरपी यंत्रणेच्या फेरआढाव्यासाठी समिती
Just Now!
X