Madhya Pradesh Assembly Election 2018 Result: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु असून बहुजन समाज पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेस १११ जागांवर तर भाजपा १०९ जागांवर आघाडीवर आहे.

गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसमोर मध्य प्रदेश कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. शेतकरी वर्गाची नाराजी, व्यापम घोटाळा हे मुद्दे भाजपला प्रतिकूल ठरले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुखे शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही एक परीक्षाच म्हणावी लागेल.

Live Blog

16:43 (IST)11 Dec 2018
काँग्रेस पुन्हा आघाडीवर

मध्य प्रदेशमधील चित्र अजूनही अस्पष्ट आहे.  निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमधील चित्र खालीलप्रमाणे: 

एकूण जागा - २३०
काँग्रेस - ११३
भाजपा - १०७
बहुजन समाज पक्ष - ३
समाजवादी पक्ष - २
अपक्ष - ४
गोंडवाना गणतंत्र पार्टी - १

13:59 (IST)11 Dec 2018
Results Live: अब की बार, काँग्रेस सरकार

13:54 (IST)11 Dec 2018
भाजपाला हादरा?, चार राज्यात काँग्रेस आघाडीवर

13:45 (IST)11 Dec 2018
बसपा भाजपाला पाठिंबा देणार नाही?

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या मध्य प्रदेशात भाजपाला पाठिंबा देणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. मायावती यांनी मध्य प्रदेशमधील नवनिर्वाचित आमदारांची बैठकही बोलावली असून यात ते पाठिंब्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

12:51 (IST)11 Dec 2018
शिवराजसिंह चौहान यांच्यावर नामुष्की, ९ मंत्री पिछाडीवर


शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील ९ मंत्री हे पिछाडीवर आहेत. नरोत्तम मिश्रा, रुस्तम सिंह, लाल सिंह आर्य, ओमप्रकाश धुर्वे आदी मंत्री पिछाडीवर आहेत.

12:47 (IST)11 Dec 2018
बहुजन समाज पक्ष ठरणार किंगमेकर

मध्य प्रदेशमधील ६ जागांवर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे बसपा किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमध्येही बसपाने काँग्रेसला साथ दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत बसपा कोणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

12:43 (IST)11 Dec 2018
मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढत

मध्य प्रदेशात चुरशीची लढत सुरु असून कधी काँग्रेस तर कधी भाजपा आघाडी घेत आहे. सध्या मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी १०९ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा १०८ जागांवर आघाडीवर आहे. अन्य पक्षाचे १३ उमेदवार आघाडीवर आहेत. 

11:36 (IST)11 Dec 2018
सतना जिल्ह्यातील कल

सतना जिल्ह्यातील सात पैकी सहा जागांवर काँग्रेस आघाडीवर असून होशंगाबादमध्ये सीतासरण शर्मा आघाडीवर

11:32 (IST)11 Dec 2018
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदी कोण?

मध्य प्रदेशमधील निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदी कोण याची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे चर्चेत आहे. तर यासंदर्भातील निर्णय राहुल गांधीच घेतील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

11:26 (IST)11 Dec 2018
जनादेशावर ज्योतिरादित्य सिंधिया म्हणतात...

जनादेशातून बदलाचे स्पष्ट संकेत मिळत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार हे स्पष्ट आहे: ज्योतिरादित्य सिंधिया

11:18 (IST)11 Dec 2018
कमलनाथ यांच्या निवासस्थानी बैठक सुरू

कमलनाथ यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, मध्य प्रदेशमधील सत्तासमीकरण आणि मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता

10:44 (IST)11 Dec 2018
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने

मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाला हादरा बसण्याची चिन्हे असून २३० पैकी तब्बल ११७ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा ९७  जागांवर आघाडीवर आहे. अन्य पक्षांचे ११ उमेदवार आघाडीवर आहेत. 

10:07 (IST)11 Dec 2018
दिग्विजय सिंह म्हणतात..

दुपारी १२ वाजता चित्र स्पष्ट होईल. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय होईल याची खात्री आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला अनुकूल वातावरण असेल: दिग्विजय सिंह

10:02 (IST)11 Dec 2018
मध्ये प्रदेशमध्ये 'कांटे की टक्कर'

मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर' सुरू असून २३० जागांपैकी ११० जागांवर काँग्रेस तर १०९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे.

09:19 (IST)11 Dec 2018
मध्य प्रदेशची साथ काँग्रेसच्या 'हात'ला?

मध्य प्रदेशमध्ये भाजपासाठी मोठा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. या राज्यात काँग्रेसने तब्बल ९२ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपा ८५ जागांवर आघाडीवर आहे. अन्य पक्षांचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत. 

08:52 (IST)11 Dec 2018
भाजपाला हादरा?, काँग्रेस आघाडीवर

मध्य प्रदेशमध्ये भाजपाला हादरा बसण्याची चिन्हे असून काँग्रेसने तब्बल ४८ जागांवर आघाडी घेतली आहे.  तर भाजपा सध्या फक्त ४२ जागांवर आघाडीवर आहे

08:41 (IST)11 Dec 2018
काँग्रेसची भाजपाला कांटे की टक्कर

मध्य प्रदेशमध्ये भाजपा सध्या २५ तर काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर

08:36 (IST)11 Dec 2018
मध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढत

मध्य प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल पाहता ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता. भाजपा सध्या १६ तर काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर.

08:34 (IST)11 Dec 2018
मध्य प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात

मध्य प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून २३० जागांवर ६५.५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

08:31 (IST)11 Dec 2018
२०१३ मधील परिस्थिती


मध्य प्रदेशमधील एकूण २३० जागांपैकी भाजपाला १६६ जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला ५७, बहुजन समाज पक्षाला ४ जागा आणि अपक्ष उमेदवार २ जागांवर निवडून आले होते.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकूण ६५.५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानापेक्षा हे प्रमाण ७ टक्क्यांनी कमी होते. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ७२.६९ टक्के मतदान झाले होते.