मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. या रॅकेटमध्ये मध्य प्रदेशातील १२ वरिष्ठ पदावरील अधिकारी आणि आठ माजी नेत्यांची नावे आली आहेत. दरम्यान या रॅकेटची मुख्य सुत्रधार असणाऱ्या श्वेता जैन हिने विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) आपण जवळपास मध्यम वर्गातील २४ कॉलेज तरुणींवर जबरदस्ती करत मध्य प्रदेश सरकारमधील उच्च पदावरील लोकांसोबत शरिरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं असल्याची कबुली दिली आहे.

श्वेता जैन हिने हनी ट्रॅपचा मुख्य उद्देश व्हीआयपींकडून हजारो कोटींची सरकारी कंत्राटं मिळवणं होता अशी कबुली दिली आहे. अनेक कंत्राटं ही श्वेता जैन आणि तिची सहकारी आरती दयाल यांच्या कंपन्यांना देण्यात आली होती. याशिवाय श्वेता जैन अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही नियंत्रणही ठेवत होती. एसआयटीने केलेल्या तपासादरम्यान श्वेता जैने कबुली दिली आहे की, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिच्याकडे तरुण मुलींची मागणी केली होती. यानंतर तिने काही कॉलेज तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं आणि आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली.

Maharashtrachi Hasyajatra women make reels on Nach Ga Ghuma Song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचे ‘नाच गं घुमा’वर रील करण्यासाठी अथक प्रयत्न, पाहा व्हिडीओ
russion yutuber harrassed by indian man
“तू खूप सेक्सी आहेस, माझं स्वप्न…”; भारतीय तरुणाकडून रशियन युवतीचा विनयभंग, VIDEO व्हायरल
Video: ‘तू खूप सेक्सी दिसतेस’; १६ वर्षीय बॉल गर्लला पाहून पंचाची शेरेबाजी
पत्नीसोबतचा Sex व्हिडिओ केला व्हायरल, पुुण्यातील धक्कादायक घटना

एसआयटीने तथ्य तपासण्यासाठी श्वेतासोबत कॉलेज विद्यार्थिनी मोनिका यादव हिची चौकशी केली. मोनिया यादवने एसआयटीसमोर खुलासा करताना सांगितलं की, “एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याच्या नादात आपण श्वेताच्या संपर्कात आलो होते. श्वेताने मध्य प्रदेश सराकरमधील एका मोठ्या व्यकीशी आपली ओळख असल्याचा दावा केला होता”. मूळची भोपाळच्या नसणाऱ्या मोनिकाचा विश्वास संपादित करण्यासाठी श्वेताने तिला सचिवालयात नेऊन आयएएस अधिकाऱ्यांची भेट घडवून दिली. श्वेताने मोनिकाला इंदूर ते भोपाळ प्रवास करण्यासाठी ऑडी कारही दिली होती.

मध्य प्रदेश: हनी ट्रॅप गँगच्या निशाण्यावर होते १३ IAS अधिकारी, सेक्स व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल करण्याचा होता कट

एसआयटी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाने श्वेतासोबत काम करण्यास नकार देत आपल्या आई-वडिलांच्या घऱी नरसिंहगडला निघून गेली होती. यानंतर आरती दयाल तिच्या घऱी गेली आणि तिचे वडील हिरालाल यांना तुम्ही मुलीला भोपाळला पाठवलंत तर एनजीओ तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलेल अशी बतावणी केली. आपली आर्थिक परिस्थिीती चांगली नसल्याने हिरालाल यांनी मुलगी मोनिकाला आरतीसोबत भोपाळमध्ये राहण्याची परवानगी दिली.

एसआयटीला दिलेल्या जबाबात मोनिकाने सांगितलं आहे की, आरतीने तिला श्वेता एका प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत सेक्स करत असतानाचा व्हिडीओ दाखवला होता. उंची गाठण्यासाठी असं करावं लागतं असं तिचं म्हणणं होतं. एसआयटीच्या तपासात आरती आणि श्वेता एनजीओ आणि गरीब कुटुंबातील मुलींना नोकरी देण्याच्या नावाखाली त्यांचा ब्रेनवॉश करत हनीट्रॅप रॅकेटमध्ये ढकलत असल्याचं समोर आलं आहे.

मोनिकाने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, ३० ऑगस्टला आरती आणि तिची सहकारी रुपा यांनी तिला एका महागड्या कारमधून इंदूरला नेलं. तिथे इन्फिनिटी हॉटेलमध्ये रुम बूक कऱण्यात आलं होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६० वर्षीय सरकारी इंजिनिअर हरभजन सिंह याची तिच्याशी ओळख करुन देण्यात आली. यानंतर मोनिकाला संपूर्ण रात्र त्याच्यासोबत सेक्स करण्यास भाग पाडलं. आरतीने याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केला आणि त्याच्या आधारे हरभजन सिंग याच्याकडे तीन कोटींची मागणी केली. मोनिकालाही याबद्दल कुठे वाच्यता केल्यास व्हिडीओ बेवसाईट अपलोड करु अशी धमकी देण्यात आली होती.

इंदूरच्या पहिल्या महिला एसएसपी असणाऱ्या रुची वर्धन सिंग ज्या एसआयटीच्या मुख्य सदस्य आहेत त्यांनी श्वेता आणि आरती मुलींना मॉडर्न आयुष्याची सवय लावत रॅकेटमध्ये ढकललं जात होतं अशी माहिती दिली आहे.