News Flash

गायक किशोर कुमार यांच्या संपत्तीचा वाद, पुतण्याचा ‘बॉम्बे बाझार’वर दावा

माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे मला हा बंगला नाईलाजाने विकण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे असे त्यांच्या पुतण्याने म्हटले आहे

आपल्या गाण्याची भुरळ सगळ्यांना पाडणारे महान गायक किशोर कुमार यांच्या संपत्तीचा वाद आता विकोपाला गेला आहे. स्वर्गीय किशोर कुमार यांच्या मध्यप्रदेशातील खंडवा या ठिकाणी असलेल्या ‘बॉम्बे बाझार’ या बंगल्यावर त्यांचा पुतण्या अर्जुन कुमार यांनी दावा केला आहे. अर्जुन कुमार हे किशोर कुमार यांचे बंधू अनुप कुमार यांचे पुत्र आहेत. बॉम्बे बाझार या बंगल्यावर माझा हक्क आहे आणि तो मीच विकणार असा दावा त्यांनी केला आहे. अर्जुन कुमार यांच्या म्हणण्यानुसार या बंगल्याची कागदपत्र माझ्या नावावर आहेत.

अर्जुन कुमार हे दावे करत असताना, किशोर कुमार यांचा लहान मुलगा सुमित कुमार याने या बंगल्याचा सौदा केल्याच्या बातम्या समोर आल्या. या बंगल्याची किंमत १४ कोटी रूपये आहे. याचा बयाणा म्हणून सुमित कुमार यांना ११ लाख रूपये दिल्याचा दावा बंगल्याचा सौदा करणारे व्यावसायिक अभय जैन यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात सुमित कुमार यांच्या पत्नीशी आपण संपर्कात आहोत असेही अभय जैन यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे अर्जुन कुमार यांनी सगळी कागदपत्रे आपल्या नावावर असल्याने सुमित कुमार सौदा करणारा कोण आहे असा प्रश्न विचारला आहे . या बंगल्यासाठी जे कर आकारले जातात तेदेखील मी भरतो. अभय जैन बंगल्याचा सौदा झाल्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. या बंगल्याच्या आसपास जे दुकानदार आहेत तेही माझ्या बाजूने आहेत असेही अर्जुन कुमार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर या बंगल्यासाठी ग्राहकांचा शोध सुरू आहे आणि बंगला मीच विकणार असेही त्यांनी म्हटले आहे.

माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे मला हा बंगला नाईलाजाने विकण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. किशोर कुमार यांच्या आठवणी या बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मला हा बंगला विकायचा नव्हता. मात्र सध्या मी बिकट आर्थिक स्थितीतून जातो आहे, असेही अर्जुन कुमार यांनी स्पष्ट केले. किशोर कुमार यांचा जन्म याच बंगल्यात झाला होता. या बंगल्याची अवस्था सध्या बिकट आहे. या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर गौरी कुंज आणि गांगुली हाऊस असे लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 5:52 pm

Web Title: madhya pradesh i will sell kishore kumar khandwas old bungalow claims nephew arjun kumar
Next Stories
1 संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यातच पोलिसांची धुलाई
2 काबूलमध्ये भारतीयासह तीन विदेशी नागरिकांची हत्या
3 मुस्लिम असल्यामुळे चार डॉक्टरांना घर सोडायला लावले
Just Now!
X