01 March 2021

News Flash

ममता बॅनर्जींना मध्य प्रदेश विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी पाठवली रामायणाची प्रत, म्हणाले…

कोलकातामधील एका कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणाबाजीमुळे ममता बॅनर्जी संतप्त झाल्या होत्या.

मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष(प्रोटेम स्पीकर) आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. विशेष म्हणजे ही माहिती त्यांनी स्वतः ट्विट्द्वारे दिली आहे.

शर्मा यांनी म्हटले आहे की, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि इथून पुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत.”

“एखाद्यास निमंत्रित करून त्याचा अपमान करणं हे तुम्हाला शोभत नाही”

तसेच, राम नामाच्या जय घोषाने ममता बॅनर्जी यांना राग येतो. “ममता दीदींना माझी प्रार्थना आहे, जय श्रीराम म्हणणं त्यांनी देखील शिकावं. प्रभू श्रीरामाचा विरोध करणं बंद करा. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमा दरम्यान तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे, बंगालची जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. अयोध्येत इतक्या वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर बनत असतानाही, ममता बॅनर्जी नाराज आहेत.” असं देखील शर्मा यांनी बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, काल (शनिवार)कोलकातामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणा अगोदर उपस्थितांना जय श्रीराम अशा घोषणा दिल्याने, ममता बॅनर्जी प्रचंड चिडल्याचे दिसून आले. एवढेच नाहीतर त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत, भाषण करण्यासही नकार होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 3:05 pm

Web Title: madhya pradesh legislative assembly protem speaker rameshwar sharma send copy of ramayana to cm mamata banerjee said msr 87
Next Stories
1 भर रस्त्यात दिवसाढवळया त्याने ‘तिला’ रोखलं आणि केलं नको ते कृत्य
2 काँग्रेसनेच घडवली सुभाषचंद्र बोस यांची हत्या – साक्षी महाराजांचा खळबळजनक आरोप
3 शेतकऱ्यांच्या नजरा दिल्ली पोलिसांकडे; दोन लाख ट्रॅक्टरची काढणार रॅली
Just Now!
X