News Flash

मालकाची विकृती, कॉम्प्रेसरने मजुराच्या गुदद्वारात भरली हवा

अत्यंत छोटयाशा कारणावरुन इतकी अमानुषता....

वेतनावरुन झालेल्या वादातून एका मालकाने आपल्या मजुरावर अमानवीय अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मालकाने कॉम्प्रेसरच्या सहाय्याने मजुराच्या गुदद्वारात हवा भरली. त्यामुळे या ४० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली. मृत मजुर दगड फोडण्याच्या खाणीमध्ये रोजंदारीवर काम करायचा.

महिन्याभरापूर्वी ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. दगड फोडणाऱ्या खाणीचा मालक आणि चार कामगार या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे म्हटले जात आहे. आठ नोव्हेंबरला मजुराने मालकाकडे त्याचे वेतन मागितल्यानंतर मालकाने त्याला जबर मारहाण केली. मारहाण करुनच हा मालक थांबला नाही, तर त्याने गुदद्वारात कॉम्प्रेसर घुसवून हवा भरली. यावेळी अन्य तीन कामागारांनी या मजुराला पकडून ठेवले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मारहाण आणि गुदद्वारात हवा भरल्यामुळे मुजराची प्रकृती बिघडली, त्यावेळी मालकाने त्याच्या कुटुंबीयांना काहीही न कळवता ग्वालेरच्या रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात या मजुराच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे पुन्हा त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. खाण मालकाने मजुराच्या कुटुंबीयांना सांगताना त्याला गॅस्ट्रीक आजार झाल्याचे सांगितले. पण शुद्धीत आल्यानंतर या मुजराने त्याच्यासोबत काय घडले ते कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर कुटुंबातील सदस्य स्थानिक पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी तक्रार नोंदवली. मजुराच्या प्रकृतीत सुधारणा होऊ न शकल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. पोलीस आता पुढील कारवाई करण्याआधी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 2:08 pm

Web Title: madhya pradesh man dies after employer pumps air into his rectum dmp 82
Next Stories
1 पोस्टाच्या तिकिटावर चक्क छोटा राजनचा फोटो; टपाल विभागाचा अनागोंदी कारभार
2 भारतातील प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचे निधन
3 “… म्हणून नितीश कुमारांनी इच्छा नसतानाही मुख्यमंत्रीपद स्वीकारलं”
Just Now!
X