News Flash

धक्कादायक! लुटमार करण्यासाठी त्याने पत्नीचा पोलीस युनिफॉर्म दिला प्रेयसीला

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून लुटमार करणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून लुटमार करणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरोडयात गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनाकडून सांगण्यात आले.

आरोपी महिला पोलीस असल्याचे भासवून लुटमार करायची. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तिच्या प्रियकरानेच पत्नीचा पोलीस युनिफॉर्म लुटमार करण्यासाठी तिला दिला होता. आरोपीची पत्नी मध्य प्रदेश पोलीस दलात पोलीस निरीक्षक आहे.

पोलिसांनी महिलेकडून बनावट पोलीस ओळखपत्र जप्त केले आहे. आरोपींची ओळख पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 2:47 pm

Web Title: madhya pradesh man gives wifes police uniform to girlfriend to loot people dmp 82
Next Stories
1 कलराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल
2 सिद्धू यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणतात..
3 लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम बापूचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला
Just Now!
X