News Flash

जीएसटी प्रणाली सीएंनाही समजेना , मग आम्हाला काय समजणार; भाजप मंत्र्याची ‘मन की बात’

जीएसटीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे.

GST Council meeting Live Updates , Only 50 items to remain in top 28 per cent bracket , Finance Minister Arun Jaitley, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
GST Council meeting : जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. तर २८ टक्के इतका कर कायम ठेवण्यात आलेल्या वस्तुंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि चैनीच्या गोष्टींचा समावेश आहे.

जीएसटीच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असताना मध्यप्रदेशमधील भाजप मंत्र्याने जीएसटी (वस्तू व सेवा कर) प्रक्रिया गुंतागुतीची असल्याचे वक्तव्य केलयं. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मध्यप्रदेशचे अन्न व पुरवठा मंत्री ओम प्रकाश ध्रुवे यांनी जीएसटीची प्रक्रिया अद्यापही समजलेली नाही, असे म्हटले. मोठे मोठे व्यापारी आणि सीए जीएसटी समजू शकलेले नाहीत. मला देखील ते समजलेले नाही, त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया देणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. सध्या जटील वाटणाऱ्या कर प्रणालीची प्रक्रिया हळूहळू समजेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधी पक्ष जीएसटीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत असताना ध्रुवे यांचे वक्तव्य एका अर्थाने विरोधी पक्षाला बळ देणारेच आहे. यापूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नव्या कर प्रणालीतील त्रूटीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले होते.शुक्रवारी जीएसटी समितीची विशेष बैठक होणार असून या बैठकीत जीएसटी प्रणालीतील समस्यावर काय उपाय योजना केले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जीएसटीअंतर्गत सर्वाधिक कर लावण्यात आलेल्या वस्तू आता स्वस्त होऊ शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी याबद्दलचे संकेत दिले होते. जीएसटी अंतर्गत २८ टक्के कर आकारल्या जाणाऱ्या ८० टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाणार असल्याचे सुशील मोदींनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 11:58 am

Web Title: madhya pradesh minister om prakash dhurve says he is unable to understand gst
Next Stories
1 चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात, ‘पद्मावती’वरून साक्षी महाराजांचे वक्तव्य
2 नोटाबंदीनंतर देशातील विमानतळांवरून २६०० किलो सोने-चांदी जप्त
3 पटेलांना आरक्षणासाठी काँग्रेसचे तीन पर्याय
Just Now!
X