24 February 2021

News Flash

मध्य प्रदेश : लग्न झाल्यानंतर अर्ध्या तासात विवाहीतेने नदीत मारली उडी, तपास सुरु

सासरी जात असताना घडला प्रकार

प्रतिकात्मक छायाचित्र

मध्य प्रदेशातील शेओपूर जिल्ह्यात २० वर्षीय विवाहीतेने लग्नानंतर सासरी जात असताना नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पाठवणीनंतर केवळ अर्ध्या तासाभरात हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विवाहीतेने सासरी जात असताना चंबळ नदीत उडी मारली, यानंतर तिचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसून पोलीस तिचा शोध घेत आहेत. राजस्थानमध्ये लग्नकार्य आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये परतत असताना रविवारी सकाळी सात वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सासरी जात असताना गाडीमध्ये विवाहीतेसोबत तिचा पती आणि काही नातेवाईक होते. गाडी चंबळ नदीवरील पाली पुलावर आली असताना, आपल्याला बरं वाटत नसल्याचं कारण देत विवाहीतेने चालकाला गाडी थांबवायला सांगितलं. चालक गाडी थांबवत नसल्याचं पाहून, विवाहीतेने स्टेअरिंग आपल्या हाती घेत ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. पती आणि इतरांना नेमकं काय सुरु आहे हे समजायच्या आधीच विवाहीतेने गाडीतून उडी मारत थेट चंबळ नदीत उडी मारली. पोलीस घटनेचा तपास करत असल्याचं, स्थानिक पोलीस अधिकारी ब्रिजराज यादव यांनी सांगितलं.

आणखी वाचा- धावत्या बसमध्ये इसमाचा मृत्यू, करोनाच्या संशयातून चालकाने पत्नीसह मृतदेहाला सोडलं रस्त्यावर

घडलेल्या प्रकाराबद्दल मुलीच्या घरी माहिती कळताच त्यांनाही धक्का बसला आहे. लग्न लागत असताना आपली मुलगी व्यवस्थित वागत होती अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकारामागचं नेमकं कारण काय असू शकेल याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 1:58 pm

Web Title: madhya pradesh nearly 30 minutes after bidai bride jumps into river remains missing psd 91
Next Stories
1 “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं”; आईन्स्टाईन यांचं वाक्य शेअर करत राहुल गांधींची मोदींवर टीका
2 धावत्या बसमध्ये इसमाचा मृत्यू, करोनाच्या संशयातून चालकाने पत्नीसह मृतदेहाला सोडलं रस्त्यावर
3 “भारताला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणणं हे आमचं लक्ष्य”
Just Now!
X