News Flash

बलात्कार पीडितेने साक्ष फिरवली; हायकोर्टाने दिले भरपाई वसूलीचे आदेश

मध्य प्रदेशमधील जितेंद्र पटेल या आरोपीने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. पटेलवर एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्ष फिरवल्याने मध्यप्रदेश हायकोर्टाने पीडितेला मिळालेल्या भरपाईची वसूली करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेशमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामिनावर मध्य प्रदेश हायकोर्टात सुनावणी झाली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलीने साक्ष फिरवली होती. या आधारे हायकोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला. निर्णय देताना न्या. एस के पालो भरपाई वसूलीचे आदेश दिले. ‘जर पीडित तरुणीला अँट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत भरपाई मिळाली असेल तर तर त्याची वसूली झाली पाहिजे. सागरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही वसूली करावी, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. मध्य प्रदेशमधील जितेंद्र पटेल या आरोपीने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. पटेलवर एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 11:03 am

Web Title: madhya pradesh rape survivor turns hostile high court orders recovery of compensation
Next Stories
1 आता तरी जनता दल सेक्यूलरला भाजपाची बी टीम म्हणू नका: मायावती
2 भोपाळमध्ये ‘निर्भया कांड’; तरुणीची अमानुष अत्याचारानंतर हत्या
3 फेसबुकने बंद केले ५८ कोटी फेक अकाऊंट्स
Just Now!
X