01 October 2020

News Flash

बदला घेण्यासाठी एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहितेच्या मुलीवर केला बलात्कार

इंदूरमध्ये राहणाऱ्या २० वर्षांच्या तरुणाचे महिलेवर एकतर्फी प्रेम होते. आरोपी हा दाम्पत्याचा नातेवाईक आहे.

संग्रहित छायाचित्र

मध्य प्रदेशमधील इंदूर येथे २० वर्षांच्या तरुणाने एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईवर त्या तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, त्यास महिलेने नकार दिल्याने नराधमाने महिलेच्या एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

सागरमध्ये राहणारे एक दाम्पत्य त्यांच्या दोन मुलींसह इंदूर येथे राहायला आले. महिलेचा पती हा एका बांधकाम साईटवर कामाला आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्या २० वर्षांच्या तरुणाचे महिलेवर एकतर्फी प्रेम होते. आरोपी हा दाम्पत्याचा नातेवाईक आहे. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार लक्षात येताच महिलेने त्या तरुणाशी बोलणे बंद केले. यामुळे तो तरुण चिडला होता.

शुक्रवारी दुपारी नराधम तरुण महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिच्या घरी गेला. मात्र, त्यावेळी तो महिलेच्या घरात जाऊ शकला नाही. रात्री उशिरा तो नराधम पुन्हा महिलेच्या घरी गेला. तो मद्यधूंद अवस्थेत होता. पीडित मुलीचे आई- वडील वरच्या खोलीत झोपले होते. तर दोन्ही मुली दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. आधी नराधम तरुणाने चार वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार करताच नराधमाने तिला सोडून दिले आणि तिच्या एक वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केला. मोठ्या मुलीने आऱडाओरडा करताच तिचे वडील खाली आले. मात्र, तोवर नराधमाने तिथून पळ काढला होता. सध्या दोन्ही मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 9:17 am

Web Title: madhya pradesh rejected by woman 20 year man rapes her 1 year old daughter for revenge in indore
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान
3 पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम! मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार ९१ रुपये
Just Now!
X