News Flash

क्रौर्याचा कळस : मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांनाही इजा

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार करुन तिच्या डोळ्यांना इजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी संध्याकाळी ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरापासून काही अंतरावर सापडली. मध्य प्रदेशच्या दमोह गावात ही घटना घडली आहे.

या प्रकाराची माहिती कळताच मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीवर निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या डोळ्यांनाही या व्यक्तीने इजा पोहचवली आहे. तिच्या चेहऱ्यावरही जमखा झालेल्या आहेत. मुलीला ताबडतोक स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिच्या डोळ्यांना झालेली दुखापत लक्षात घेता तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या डॉक्टर तिच्या डोळ्यांवर उपचार करत आहेत.” स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. या मुलीच्या डोळ्यांना झालेली इजा ही इतकी भयंकर होती की स्थानिक डॉक्टरांना त्याची तपासणीही करता आली नाही.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कडक शिक्षा करण्यात येईल असं आश्वास दिलं आहे.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं पाठवण्यात आलेली आहेत. हे काम स्थानिक भागात राहणाऱ्या व्यक्तीचं असावं असा संशय पोलिसांना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 8:11 pm

Web Title: madhya pradesh six year old girl raped her eyes damaged by accused psd 91
Next Stories
1 देशभरातल्या करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० च्या वर, २४ तासात ३४ मृत्यू
2 झारखंड : करोना झाल्याच्या अफवेवरुन संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
3 जबरदस्त! DRDO ने पंधरा दिवसात उभी केली दिवसाला हजार करोना टेस्ट करणारी प्रयोगशाळा
Just Now!
X