News Flash

मध्य प्रदेशमधील सपा, बसपा आमदार भाजपाच्या वाटेवर?

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घरी पोहचले

मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारसाठी आजचा दिवस धक्कादायक ठरताना दिसत आहे. कारण, सकाळपासून काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सर्वप्रथम काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राज्य सरकारमधील काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसह १९ आमदारांनी राजीनामे दिले. पाठोपाठ मध्य प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बिसाहु लाल साहू यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता, राज्यातील काँग्रेस सरकारला पाठिंबा देणारे समाजवादी पार्टीचे व बहुजन समाज पार्टीचे आमदार देखील भाजपाच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे.

मध्य प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे आमदारा राजेश शुक्ल व बहुजन समाज पार्टीचे आमदार संजीव कुशवाह हे दोघेही भाजपा नेते माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत.  सध्या मध्य प्रदेशमध्ये वेगवाग राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवाय, अनेक आमदारांनी काँग्रेसचा हात सोडल्याने आता मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आल्यात जमा आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी ११४ जागांसह काँग्रेस सत्तेत आहे. भाजपाच्या १०७ जागा आहे. बसपाच्या २, समाजवादी पक्षाची १ आणि चार अपक्ष आमदार असं आतापर्यंतच राजकीय बलाबल होतं. मात्र आज काँग्रेसच्या एका आमदाराने भाजपात प्रवेश केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 3:39 pm

Web Title: madhya pradesh sp mla rajesh shukla and bsp mla sanjeev kushwaha arrive at the residence of bjp leader shivraj singh chouhan msr 87
Next Stories
1 मध्य प्रदेश काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदाराचा भाजपात प्रवेश
2 ऑपरेशन लोटस मध्य प्रदेशात यशस्वी; कमलनाथ यांचं सरकार कोसळणार
3 भाजपात ज्योतिरादित्य शिंदे यांना काय मिळणार? हे आहेत पर्याय
Just Now!
X