म. गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा पुतळा हिंदू महासभेच्या कार्यालयात बसविणारे ग्वाल्हेर महापालिकेतील नगरसेवक बाबूलाल चौरसिया याला काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे.

चौरसिया याने सहा वर्षांपूर्वी काँग्रेसला रामराम केला होता. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत भोपाळमध्ये चौरसिया या पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला. मात्र चौरसिया याला पक्षात प्रवेश देण्यात आल्याने पक्षातील काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गोडसे याच्या अनुयायाला पक्षात प्रवेश देणे एवढे गरजेचे होते का, असा सवाल पक्षातील काही नेते करू लागले आहेत. मात्र चौरसिया याने हिंसक विचारसरणी सोडून म. गांधीजींनी दाखविलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून चालण्याचे ठरविले आहे, असे सांगून काही जणांनी त्याला पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे समर्थन केले आहे.

हिंदू महासभेच्या  नेत्यांनी आपली दिशाभूल केली आणि गोडसे याच्या पुतळ्याची पूजा करावयास लावली, असा दावा चौरसिया याने केला आहे.