28 October 2020

News Flash

‘डान्सिंग अंकल’च्या मेहुण्यावर भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनास्थळीच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास येत आहेत.

dabbu ji

अवघ्या बॉलिवूडकरांना आणि नेटकऱ्यांना आपल्या नृत्याने सर्वांचच लक्ष वेधणाऱ्या डब्बू अंकल म्हणजे डान्सिंग अंकलच्या मेहुण्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या मेहुण्याची हत्या करण्यात आली आहे, त्याच्याच लग्नातील संजीव श्रीवास्तव यांचा तो डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे ते डान्सिंग अंकल म्हणून ओळखले जाऊ लागले.

दरम्यान, ज्या मेहुण्याला गोळी मारण्यात आली आहे त्याचं नाव कुशाग्र असून, सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. सध्या त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ग्वाल्हेरच्या जनक गंज ठाणे परिसरात ही घटना घडली. कोणा एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. त्याच्या पायाला गोळी लागल्याचं वृत्तं ‘आज तक’ने प्रसिद्ध केलं आहे. सध्या या सर्व प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनास्थळीच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास येत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच संजीव श्रीवास्तव हे ग्वाल्हेरला रवाना झाल्याचं कळत आहे.

कोण आहेत डान्सिंग अंकल?
दरम्यान, काही दिवसांआधी संजीव श्रीवास्तव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते अभिनेता गोविंदावरच चित्रीत एका गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळालं होतं. गोविंदा आणि निलम यांच्या ‘खुदगर्ज’ चित्रपटातलं ‘दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से’ हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होतं. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सना गोविंदाची आठवण झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. या काकांचा अंदाज आणि त्यांची भन्नाट नृत्यशैली सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती. ज्यानंतर त्यांचे इतरही काही व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत होते. त्यांच्या नृत्याची दखल कलाविश्वातही घेतली गेली होती. खुद्द गोविंदानेही या काकांची प्रशंसा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 6:37 pm

Web Title: madhya pradesh viral dancing star dabbu ji relative shot at in gwalior
Next Stories
1 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुमारस्वामींना जाहीर, भाजपाने उडवली खिल्ली!
2 FB बुलेटीन: खड्ड्यांविरोधात मनसेचं खळखट्याक आणि छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली यासह अन्य बातम्या
3 हे पाकिस्तानचे कार्यालय म्हणत भाजयुमोकडून शशी थरूर यांच्या कार्यालयाची तोडफोड
Just Now!
X