सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या एका रुग्णाचा केवळ आयसीयूची चावी सापडेपर्यंत जीव गेला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील उजैन शहरात घडली.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर एका ५५ वर्षीय महिलेला गुरुवारी रात्रा उजैनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या महिलेची परिस्थिती आणखी बिघडतेय असे लक्षात आल्यानंतर शहरात ज्या करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत तिथे तिला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तिच्या करोना चाचणीसाठी काही नमुनेही घेण्यात आले.

मात्र, परिस्थिती आणखी बिकट होतेय हे दिसताच तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अँम्ब्युलन्सची सोय करण्यात आली. या ५५ वर्षांच्या महिलेला घेऊन अँम्ब्युलन्स त्या खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यानंतर तेथे तिला स्ट्रेचरवरून आत नेण्यात आले. पण, तेथे आयसीयूचे कर्मचारीच उपस्थित नव्हते. शेवटी आयसीयूचे कुलूप तोडण्यात आले. या काळात महिलेची प्रकृती आणखी खालावली. थोड्या वेळानं कुलूप तोडण्यात कर्मचाऱ्यांना यश आलं. पण, त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करूनही महिलेचा जीव वाचू शकला नाही.