तरुणीला मद्य पिण्यासाठी भाग पाडून चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मध्य प्रदेशच्या शाहडोल जिल्ह्यात रविवारी ही धक्कादायक घटना घडली. गदाघाट भागातील एका फार्महाऊसमध्ये तरुणीला जबरदस्तीने मद्य पिण्यासाठी भाग पाडण्यात आले.
त्यानंतर १८ आणि १९ फेब्रुवारीला तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितले. जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
“२० फेब्रुवारीला चारही आरोपी पीडित तरुणीला तिच्या घरासमोर सोडून निघून गेले. तिच्या नातेवाईकांनी नंतर या प्रकरणी तक्रार नोंदवली. पीडित तरुणीला सर्वप्रथम जैतपूर येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे” असे मुकेश वैश्य यांनी सांगितले
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 5:06 pm