News Flash

भोपाळमध्ये ‘निर्भया कांड’; तरुणीची अमानुष अत्याचारानंतर हत्या

भोपाळमधील प्रगती नगर परिसरात २८ वर्षांची तरुणी एका तरुणासोबत राहत होती. या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

संग्रहित छायाचित्र

मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे २८ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येपूर्वी त्या तरुणीवर अमानूष अत्याचार केल्याचे समोर आले असून तिच्या गुप्तांगात बीअरच्या बाटल्यांचे तुकडेही आढळल्याचे शवविच्छेदनातून उघड झाले आहे.

भोपाळमधील प्रगती नगर परिसरात २८ वर्षांची तरुणी एका तरुणासोबत राहत होती. या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता तरुणीचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरील परिस्थिती आणि अर्धनग्न अवस्थेतील मृतदेहावरुन तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनात तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पीडित तरुणी आणि तिच्यासोबत राहणारा तरुण हे दोघेही विवाहित असल्याचे शेजारच्यांना वाटत होते. पण ते पती-पत्नी होते का, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तो तरुण हा कामगार होता. तर तरुणी ही दिवसभर घरातच असायची. ते दोघेही परिसरातील अन्य मंडळींशी फार बोलायचे नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

पीडित तरुणी ज्या घरात राहत होती त्या घराचा मालक सौदी अरेबियात असतो, असे समजते. शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या गुप्तांगात बीअरच्या दोन बाटल्याचे तुकडेही आढळले आहेत. भिंतीवर डोक आपटून तिची हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुणी ज्याच्यासोबत राहत होती तो तरुण घटनेनंतर पसार झाला आहे. पोलिसांनी नराधमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 10:41 am

Web Title: madhya pradesh woman raped murdered beer bottles found in private parts in bhopal
Next Stories
1 फेसबुकने बंद केले ५८ कोटी फेक अकाऊंट्स
2 येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा आज फैसला; सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
3 काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; बीएसएफ जवान शहीद
Just Now!
X