दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांपैकी एक असणारी नलिनी श्रीहरन हिला मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने एका दिवसाचा पॅरोल मंजूर केला. नलिनी श्रीहरन हिच्या वडिलांचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या १६व्या दिवशीच्या कार्याला उपस्थित राहण्यासाठी तिला पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. नलिनीकडून तीन दिवसांपूर्वी यासंबंधीचा विनंती अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. आज दुपारी चार वाजल्यापासून ते उद्याच्या चार वाजेपर्यंत या पॅरोलची मुदत असणार आहे. यादरम्यानच्या काळात पोलीस तिच्याबरोबर असतील.