News Flash

मद्रास हाय कोर्टाने सर्व दारु दुकानं बंद करण्याचे दिले आदेश, होम डिलिव्हरीची दिली परवानगी 

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने दारु दुकानं बंद करण्याचे आदेश...

संग्रहित छायाचित्र

मद्रास हाय कोर्टाने तामिळनाडू सरकारला राज्यातील सर्व दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने तामिळनाडू सरकारला उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दारू दुकानं बंद करण्याचा आदेश दिला आहे.

लॉकडाउनदरम्यान गुरूवारी(दि.७) पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये दारुची दुकानं सुरू झाली होती. पहिल्याच दिवशी जवळपास १७० कोटी रुपयांच्या दारुची विक्री तामिळनाडूमध्ये झाली. पण,  शुक्रवारी (दि.८) पुन्हा एकदा तामिळनाडूमधील सर्व 3,850 दारु दुकानं बंद करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. मात्र, ऑनलाइन दारुची विक्री आणि होम डिलिव्हरी करण्याची परवानगी यावेळी देण्यात आली आहे. याचसोबत लॉकडाउन संपेपर्यंत दारुची दुकानं बंदच ठेवावीत असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने उच्च न्यायालयाने ऑनलाइन दारु विक्री आणि होम डिलिव्हरीला परवानगी देत, राज्यातील सर्व दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले.

यापूर्वी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही मद्याच्या दुकानांवर गर्दी उसळत असल्याने टाळेबंदीच्या काळात थेट संपर्काशिवाय किंवा ऑनलाईन विक्री आणि घरपोच सेवा या पर्यायांचा विचार करावा, अशी सूचना राज्य सरकारांना केली आहे. “आम्ही कोणताही आदेश देणार नाही. पण, सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियम आणि निर्देशांचं पालन व्हावं, यासाठी अप्रत्यक्ष विक्री अर्थात होम डिलिव्हरीचा विचार करावा,” अशी सूचना न्यायालयानं राज्यांना केली आहे.

विषाणू आणि मद्यव्यवहार..

* देशभरात मद्याची ७० हजार दुकाने, या आठवडय़ात ५ कोटीहून अधिक लोकांकडून मद्यखरेदी.

* मद्यविक्री दुकानांत सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने विषाणू बाधितांमध्ये वाढ.

* टाळेबंदीनंतर करोनाचा फैलाव घटल्याचे दिसत होते, परंतु आता त्यात लक्षवेधी वाढ झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 9:00 am

Web Title: madras high court orders closure of all liquor shops in tamil nadu permits only online sale sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुलाबाळांसोबत सायकलवरुन गावी निघालेल्या पती-पत्नीचा मन सुन्न करणारा शेवट
2 Coronavirus Updates: महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण, ४८ मृत्यू, संख्या २० हजार २०० च्या वर
3 ग्राहकांना घरपोच मद्य पुरवा!
Just Now!
X