सॉलोमन बेटाच्या किनारपट्टीला भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार हा ७.७ रिश्टर स्केलचा धक्का असल्याचे समजते. या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वर्तवण्यात येत आहे. अमेरिकन भूगर्भ विभागा जिवित व वित्तहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. सॉलोमन, वानुआतु, पापुआ न्यू गिनी, नोरू, न्यू सेलेडोनिया, तुवालू आणि कोसरीच्या किनारपट्टीला आगामी तीन तास धोक्याचे आहेत. स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजून ३८ मिनिटांनी भूकंप झाला.

किराकिरापासून सुमारे ६८ किलोमीटर पश्चिमेस भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. सॉलोमन बेट हा पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेस मेलानेसिया येथे सुमारे एक हजार बेटांनी बनलेला देश आहे. सुमारे २८,४०० चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या देशाची राजधानी गुवाडलकॅनाल बेटावरील होनिआरा ही आहे.