News Flash

महाभारताचे महाकाव्य आता ट्विटरवर

ब्रिटनच्या भारतीय शिक्षण संस्थेने महाभारत हे संस्कृत महाकाव्य ट्विटरच्या माध्यमातून मांडण्याचे ठरवले आहे. हे महाभारत त्यातील खलनायक दुर्योधनाच्या माध्यमातून मांडले आहे.

| February 17, 2015 01:44 am

ब्रिटनच्या भारतीय शिक्षण संस्थेने महाभारत हे संस्कृत महाकाव्य ट्विटरच्या माध्यमातून मांडण्याचे ठरवले आहे. हे महाभारत त्यातील खलनायक दुर्योधनाच्या माध्यमातून मांडले आहे.
चिंदू श्रीधरन हे ब्रिटनच्या दक्षिण किनारी प्रदेशात असलेल्या बोर्नेमाउथ विद्यापीठातील पत्रकारितेचे प्राध्यापक व माजी वार्ताहर असून त्यांनी ही कल्पना मांडली आहे. त्यांनी हे भारतीय महाकाव्य मायक्रोब्लॉगिंग व डिजिटल कथाकथन शैलीतून सांगण्याचा प्रयोग २००९ मध्ये केला. चार वर्षांत त्यांनी त्यावर २७०० ट्विटस लिहिले व त्यानंतर पहिली ट्विटर कादंबरी ‘एपिक रिटोल्ड’ नावाने डिसेंबरमध्ये भारतात प्रसृत करण्यात आली आहे. एकूण १००००० कडवी किंवा श्लोक महाभारतात असून हिंदू धर्मात तो महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यात मानवी आयुष्याचे ध्येय हे कौरव व पांडव यांच्यातील लढय़ाच्या माध्यमातून सांगितले आहे. एपिक रिटोल्डचा पुढचा भाग कौरवांचा मोठा भाऊ व खलनायक याच्या दृष्टिकोनातून प्रथमच मांडले जात असून ते महाभारताच्या पहिल्या आवृत्तीपेक्षा लहान असेल.
यात आपण दुर्योधनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. त्याची भूमिका नेमकी काय होती. पहिल्यांदा भीमाचे सत्य या स्वरूपात ट्विटरवर एपिक रिटोल्ड मांडले आहे. दुर्योधनाच्या भूमिकेतून मांडले आहे असे श्रीधरन यांनी सांगितले. या ट्विटर महाकाव्याचा दुर्योधनावर आधारित भाग चर्चेच्या पातळीवर असून प्रकाशक त्यावर काही निर्णय घेतील. कादंबरीपेक्षाही लहान अशी ही कथा आहे.
 यावेळी त्याचा कच्चा मसुदा तयार आहे फक्त ट्विट करण्याचे बाकी आहे. ट्विटरवरचे महाभारत हा एक प्रयोग आहे व तो एक नवा आकृतिबंध आहे. प्रयोग म्हणून आपण ही सुरुवात केली आहे, अजून तो प्रयोग चालू आहे. या गोष्टीचे आकर्षण कधी संपणारे नाही.
 या कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो पण या गोष्टी ऐकतानाच त्यांचे पुनर्कथन करण्याची कल्पना सुचली. महाभारताची कथा पुन्हा सांगण्यास योग्य आहे असे वाटले, तुकडय़ातुकडय़ाने ही गोष्ट सांगता येते, अनेक आठवडय़ात, महिन्यात ती विभागता येते. लोकांनी ती गोष्ट या विशिष्ट कालावधीत वाचावी यासाठी अतिशय पकड घेणारी कथा मांडावी लागते. महाभारताच्या कथेत हे सर्व गुण आहेत. माध्यमातून युद्ध चित्रण हा  आपला आवडता विषय आहे. महाभारताकडे आपण युद्धकथा म्हणून पाहतो असे श्रीधरन यांनी सांगितले. @epicretold   या ट्विटर हँडलवर ही कथा आपण टाकली त्याला ती कालातीत व वैश्विक महाकाव्याची कथा आहे व त्याला जागतिक प्रेक्षक आहेत. त्याचे मूळ यश संस्कृतातील १ लाख श्लोकांमध्ये आहे.
महाभारताचे महत्त्व ते पहिल्यांदा १९८८ मध्ये टीव्हीवर आले तेव्हाच समजले होते. दुसरी कथा ट्विटरवर लवकरच येत आहे, त्यात अनेक डिजिटल प्रयोग करण्यात आले आहेत. ट्रान्समीडिया इकॉलॉजी म्हणजे आंतरमाध्यम परिस्थितीकीचा तो एक भाग आहे. आता कुठलेही पुस्तक हे केवळ पुस्तक राहणार नाही, चित्रपट राहणार नाही तर त्याची डिजिटल रूपे येणार हे उघड आहे. एपिक रिटोल्ड हा तसाच प्रकार आहे. मुद्रित माध्यमांचा हा डिजिटल विस्तार आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 1:44 am

Web Title: mahabharata epic now on twitter
टॅग : Twitter
Next Stories
1 बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नाही – मांझी
2 निवडणुकीच्या चाचणीत नापास ;किरण बेदी यांची कबुली
3 तीन दिवसात स्वाइन फ्लूचे १०० बळी
Just Now!
X