28 February 2021

News Flash

राज्यातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

आज (मंगळवार) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

venkaiah naidu : देशाचे नवे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते सन्मान

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील २५ शिक्षकांची निवड झाली आहे. आज (मंगळवार) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात १७ प्राथमिक, आठ माध्यमिक आणि दोन शिक्षक विशेष श्रेणीचे आहेत. पदक, प्रमाणपत्र आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सन्मानप्राप्त शिक्षकांची यादी

’ प्राथमिक शिक्षक : नागोराव तायडे (महापालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. २, घाटकोपर), उज्ज्वला नांदखिले (जिप प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता. हवेली पुणे), शोभा माने (जिप प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगांव, जि. सांगली), तृप्ती हतिसकर (महापालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी), सुरेश शिंगणे (जिप उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव चिलमखा, पो. उंबरखेड, जि. बुलडाणा), संजीव बागूल (जिप प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे, ता. मुळशी, पुणे), राजेशकुमार फाटे (जिप प्राथमिक शाळा, डोंगरगाव, जि. भंडारा), ज्योती बेलावळे (जिप प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी), अर्जुन ताकटे (जिप प्राथमिक शाळा, अहेरगाव, जि. नाशिक), रुख्मिणी कोळेकर (जिप प्राथमिक शाळा, वांगी-२, जि. सोलापूर), रामकिशन सुरवसे (जिप प्राथमिक शाळा, नागोबावाडी, जि. लातूर), प्रदीप शिंदे (जिप प्राथमिक शाळा, शिलापूर, नाशिक), अमीन चव्हाण (जिप उच्च प्रा. शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, जि. यवतमाळ), ऊर्मिला भोसले (जिप प्रा. शाळा, महालदारपुरी, जि. उस्मानाबाद), गोपाल सूर्यवंशी (जिप प्रा. शाळा, गंजुरवाडी, लातूर)

’ माध्यमिक : नंदा राऊत (मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, बीड), स्मिता करंदीकर (अहिल्यादेवी मुलींची उच्च माध्यमिक शाळा, शनिवार पेठ, पुणे), नंदकुमार सागर (मुख्याध्यापक – जिजामाता उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, जेजुरी, जि. पुणे), शर्मिला पाटील (अंबिका विद्यालय, केडगाव, जि. नगर), सुनील पंडित (मुख्याध्यापक- प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीपेठ, नगर), कमलाकर राऊत (योगेश्वरी नूतन विद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई), संजय नारलवार (मुख्याध्यापक- प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. जि. गडचिरोली)

’ विशेष श्रेणी : अर्चना दळवी (जिप प्राथमिक शाळा, बाहुली, ता. हवेली, पुणे), सुरेश धारव (जिप प्राथमिक शाळा क्रमांक २, निफाड), डॉ. मीनल सांगोळे (मूक-बधिर शाळा, शंकरनगर, नागपूर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:58 am

Web Title: maharashtra 25 teachers get national award
Next Stories
1 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी नाशिक दौऱ्यावर
2 नोटाबंदीमुळे नेमका किती काळा पैसा बाहेर आला हे माहित नाही: रिझर्व्ह बँक
3 केरळमध्ये गोमांस सेवनावर बंदी नाही: पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्नानथनम
Just Now!
X