30 September 2020

News Flash

दिलासादायक : करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राची आघाडी कायम

मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी केली करोनावर मात

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव एकीकडे झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्येतही दरररोज भर पडत असल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी करोनावर मात केली आहे. विशेष म्हणज करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. एका दिवसात राज्यात १३ हजार जणांनी करोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो, या ठिकाणी एका दिवसात १० हजारापेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जवळपास ५७ टक्के नवे करोनाबाधित हे पाच राज्यांमधील आहेत. तर, करोनामुक्त झालेल्या एकूण संख्येतील ५८ टक्के रुग्ण देखील याच पाच राज्यांमधील आहेत.

मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची देशभरातील संख्या आता ३७ लाख २ हजार ५९५ वर पोहचली असून, देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ७७.८८ टक्क्यांवर  आहे. यामधील ५८ टक्के बरे झालेले रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

देशातील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मे महिन्यात ५० हजारांवर असलेली करोनामुक्त झालेल्यांची संख्या सप्टेंबरमध्ये ३६ लाखांवर पोहचली. दिवसाकाठी साधरणपणे ७० हजार रुग्ण करोनामुक्त होत आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३.८ पट अधिक आहे.

देशभरात १२ सप्टेंबरपर्यंत ५,६२,६०,९२८ नमूने तपासण्या झाल्या आहेत. यातील १० लाख ७१ हजार ७०२ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:19 pm

Web Title: maharashtra continues to lead with over 13000 recoveries msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “५६ लोकं हिंसाचारात मारली गेली, भडकाऊ भाषणांचा व्हिडिओ आहे, त्यांच्यावर कारवाई का नाही?”
2 करोनामुक्त झालेल्यांना आरोग्य मंत्रालयाच्या खास सूचना
3 बापरे! करोनाबाधितांची संख्या ४७ लाखांच्या पुढे; २४ तासांत ९४,३७२ नवे रुग्ण
Just Now!
X