सातारा जिल्हा शुक्रवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर, पाटण आणि कराड येथील काही भागांमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातील गावांना यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. हा धक्का ३.५ रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २१ कि.मी. अंतरावर वारणेतील जवळे गावात होता.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी होती. या भूकंपामुळे भारतात जीवितहानी झाली नसली पाकमध्ये एका मुलीचा मृत्यू झाला होता.