News Flash

महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

देशातील २८ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) चे एकूण २८,२५२ रुग्ण आढळले आहेत.

ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली (Photo: PIB)

करोना असतांना देशात म्युकरमायकोसिसचे नवीन संकट आले आहे. देशातील २८ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) चे एकूण २८,२५२ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८६ टक्के म्हणजेच २४३७ प्रकरणांमध्ये करोना संक्रमणाचा इतिहास आहे. तसेच १७,६०१ मधुमेह असलेले रुग्ण आहेत. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक ६,३३९ रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये ५,४८६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आज करोना संदर्भात उच्चस्तरीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन होते. परराष्ट्रमंत्री मंत्री डॉ. जयशंकर, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप पुरी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे या बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा – Mucormycosis: ‘…तर ब्लॅक फंगसवरील उपचारांचा खर्च ३५ हजारांवरून ३५० रुपयांवर येईल’

डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना परिस्थिती व त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करून सांगितले की, “रिकवरी दर वाढत आहे आणि आज तो ९३.९४ टक्के आहे. आज गेल्या २४ तासांत, गेल्या ६१ दिवसांत सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले. आज केवळ १,००,६३६ बाधित आढळले. तसेच या २४ तासांत १,७४,३९९ रूग्ण बरे झाले आहेत. देशातील कोविडमधील मृत्यूचे प्रमाण १.२० आहे.

लसीकरणाबाबत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, देशातील नागरिकांना २३,२७,८६,४८२ डोस देण्यात आले. १८ तो ४४ वयोगटातील २,८६,१८,५१४ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यांकडे १.४ कोटीहून अधिक डोस उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 7:52 pm

Web Title: maharashtra has the highest number of black fungus patients srk 94
Next Stories
1 १८ वर्षांपुढील सर्वांना मोफत लस : मोदींच्या घोषणेनंतर काँग्रेस आमदाराने मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार
2 “पेट्रोल पंपावर गेल्यावर महागाईचा विकास दिसणार”; राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
3 चमत्कारी औषधं आणि डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र
Just Now!
X