28 February 2021

News Flash

महाराष्ट्र, झारखंड, हरियाणाबरोबरच जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता

राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाने बोलावली महत्वपूर्ण बैठक

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडबरोबरच जम्मू-कश्मीरमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तिन्ही राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. तर याचवेळी जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या दृष्टीने भाजपाने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष कितपत तयार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी मंगळवारी भाजपाने जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे या बैठकीस पंतप्रधान मोदी, गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना आणि राज्यातील अन्य वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. अशातच जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत, या मागचे कारण विधानसभा निवडणूकच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर, हरियाणा विधानसभेचा २ ऑक्टोबर व झारखंड विधानसभेचा ५ जानेवारी २०२० रोजी समाप्त होणार आहे. मात्र, वेळे अगोदरच निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 10:04 pm

Web Title: maharashtra jharkhand haryana as well as jammu and kashmir likely to hold assembly elections msr 87
Next Stories
1 भारत रशियाकडून ‘आर -२७’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार
2 प्रियंका गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनवा, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मागणी
3 ‘आम्ही भारतीयच आहोत, मात्र कलम ३५ अ व ३७० हटवता कामा नये’
Just Now!
X