महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील पाच गावांच्या रहिवाशांनी आपल्या गावांचे तेलंगणमध्ये विलिनिकरण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तेलंगण सरकारद्वारे लागू करण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांपासून आकर्षित होऊन गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये नालगाव, भोकर, डिग्लूर, किनवट आणि हाथगाव या गावांचा समावेश आहे. निरनिराळ्या पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव याची मंगळवारी भेट घेतली. तसंच तेलंगणमध्ये या गावांच्या विलिनिकरणाची मागणी करत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णयही घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील पाच गावातील लोकांनी तेलंगण सरकार राबवत असलेल्या योजना आपल्या गावात राबवण्याची विनंती केली आहे. अन्यथा आपल्या गावांचे तेलंगणमध्ये विलिनिकरण होऊ द्यावं अशी मागणी केल्याची माहिती तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र सरकार तेलंगणा राज्यात राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणार आहे. जर महाराष्ट्र राज्य सरकार या योजना राबविण्याच्या स्थितीत नसेल तर आम्ही आमची गावे तेलंगणा राज्यात विलीन करण्याची मागणी करत आहोत. आम्ही या मागणीसह आंदोलन करू. या घोषणेसह आम्ही आगामी विधानसभा निवडणुका लढवू. केसीआर यांनी आम्हाला संधी दिल्यास आम्ही ‘टीआरएस’च्या तिकिटांवर निवडणूक लढवू, असे या निवेदनात म्हटले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

तसंच यावेळी तेलंगण भाजपानं तेलंगण मुक्ती दिवस साजरा करण्याचीही मागणी केली. त्यांनी तेलंगणचे राज्यपाल तमिलिसाई सुन्दरराजन यांची भेट घेतली. तसंच 17 सप्टेंबर रोजी तेलंगण मुक्ती दिवस साजरा करू देण्याची मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra nanded district five villages wants merger in telangana met cm chandrashekar rao jud
First published on: 18-09-2019 at 09:39 IST