News Flash

मध्य प्रदेशनंतर भाजपाच्या निशाण्यावर महाराष्ट्र?

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार कोसळणार

भाजपाच्या निशाण्यावर महाराष्ट्र?

रंगपंचमीच्या दिवशीच मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. मागील १८ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसने ज्योतिरादित्य यांचा राजीनामा स्वीकारला असून ते लवकरच भाजपामध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना समर्थ देणाऱ्या काँग्रेसच्या १९ आमदारांनी राजीनामे दिले असून यामध्ये कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचा समावेश आहे. यामुळे आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये राजकीय खलबते शिजत असतानाच ट्विटवर मात्र महाराष्ट्राची चर्चा आहे. यासाठी करोनाचे दोन रुग्ण आढळल्याच्या वृत्ताबरोबर राजकीय घडामोडींमुळेही महाराष्ट्र चर्चेत आल्याचे चित्र दिसत आहे.

Maharashtra हा टॉपिक ट्विटवर मंगळवारी काही काळ टॉप ट्रेण्ड होत होता. मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर महाराष्ट्र हा शब्द वापरुन ट्विट करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याचे दिसून आले. काही तासांमध्ये Maharashtra असा उल्लेख असणारे २० हजारहून अधिक ट्विट करण्यात आले. यामध्ये प्रमुख्याने मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर केल्यानंतर आता भाजपा आपला मोर्चा महाराष्ट्र आणि राजस्थानकडे वळवले, महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपाला बहुमत असताना शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्याने आता त्यांना मध्य प्रदेशमधील राजकारणावरुन नैतिकतेवर बोलण्याचा हक्क नाही, मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात संत्तांतर घडण्याची शक्यता अशा विषयांवर शेकडो ट्विटस करण्यात आले आहेत.

नक्की वाचा >> महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्यास होणार ‘टफ फाईट’

मध्य प्रदेशनंतर…

राजस्थान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशमधील घडामोडी बघून

हे होणारचं होतं

यानंतर महाराष्ट्र…

आम्ही तर मतदान पण केलयं

महाराष्ट्रात बसणार राजकीय भूकंपाचे झटके

आता महाराष्ट्र

मध्य प्रदेश झालं आता

महाराष्ट्रात सत्ता बदल हवाल

तुम्ही महाराष्ट्रात काय केलं?

काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी देखील या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना, मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं मला वाटत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसणार यावर केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. तसेच या सत्तांतरानंतर याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार का हे येणारा काळच सांगेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 3:44 pm

Web Title: maharashtra trends top on twitter after political crisis in madhya pradesh scsg 91
Next Stories
1 Video : अरे देवा! लायसन्स मिळताच पठ्ठ्या गाडी घेऊन गेला अन् ….
2 चितेच्या राखेपासून ‘या’ ठिकाणी खेळली जाते होळी!
3 Video : करोनाचा धसका; टॉयलेट पेपरवरुन दोन महिलांमध्ये हाणामारी
Just Now!
X