अमरावती जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरावर करोनाचं संकट आलं आहे. अमरावती येथील एक व्यापारी आणि त्याचे चार कुटुंबीय करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. ताप, सर्दी-खोकला असतानाही या व्यापाऱ्यानं कुटुंबासमवेत अमरावतीहून मेरठ असा रेल्वे प्रवास केला. अमरावती शहरात, रेल्वेत आणि मेरठ शहरांसह त्या पाच व्यक्तींच्या संपर्कात किती जण आले याबद्दल सध्या माहिती घेतली जात आहे. मात्र, त्या व्यापाऱ्याच्या एका चुकीमुळे हजारो जणांना करोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यापाऱ्याने अमरावती-मेरठ असा रेल्वेचा प्रवास केला होता. मेरठमध्ये एका लग्नसमारंभातही उपस्थिती दर्शवली होती. तसेच मस्जीदमध्ये नमाजासाठीही गेला होता. त्याशिवाय उपचारासाठी त्या व्यापाऱ्यानं तीन रूग्णालयाला भेटी दिल्या आहे. व्यापाऱ्याच्या एका चुकीमुळे फक्त मेरठमध्ये २०० जणांना करोनाचा संसर्ग होण्याची भिती आरोग्य खात्यामार्फत व्यक्त करण्यात येत आहे.

मेरठ आरोग्य विभाग या प्रकरणी अमरावती येथील आधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे. त्यामार्फत अमरावती येथे व्यापारी कुठे राहत होता आणि कोणाच्या संपर्कात आला होता. याबाबतची माहिती घेऊन करोनाची साखळी तोडता येईल. अमरावती येथील व्यापाऱ्याच्या घराला सॅनिटाइज करण्यात येईल. व्यापारी राहत असलेल्या गुल्ली आणि भागांतील लोकांना भेटून त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

करोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी साखळी तोडणं गरजेचं आहे. या महामारीची साखळी तोडल्यास या रोगाला आटोक्यात येऊ शकते. मेरठमध्ये २०० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. यापैकी ७० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ५० जण त्या व्यापाऱ्याचे नातेवाइक आहेत. या सर्वांची चाचणी केली जाणार असून आय़सोलेशन वार्डात पाठवण्यात येईल.

करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी या महामारीची साखळी तोडणं गरजेचं आहे. पण व्यापाऱ्यासारखी मोठी चूक झाल्यास ही साखळी तोडणं कठीण होणार आहे. देशातील करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घेण्यात आला आहे. सर्वांना घरात राहून करोनाला हरवावं, असं अवाहन मोदी यांनी केलं आहे.