सीमेवरील कुंपण आणि रस्ते यांच्या छायाचित्रांसारखी गोपनीय माहिती पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेच्या एजंटला पुरवल्याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख रियाझुद्दीन असे त्याचे नाव असून, तो मूळचा महाराष्ट्रातील जालन्याचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांपासून रियाझुद्दीन याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यावर ‘बीएसएफ’ची नजर होती. हेरगिरीबाबत खात्रीलायक पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दोन मोबाईल फोन आणि सात सीम कार्ड त्याच्याकडून जप्त करण्यात आली.

रियाझुद्दीनने सीमेवरील कुंपण व रस्ते, ‘बीएसएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि इतर काही गुप्त माहिती ‘आयएसआय’चा एजंट मिर्झा फैजल याला दिल्याचा आरोप आहे. रियाझुद्दीन हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्य़ातील रेणापूरचा रहिवासी असून तो पंजाबमधील फिरोझपूर सेक्टरमध्ये ‘बीएसएफ’च्या २९व्या बटालियनमध्ये तैनात होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtras bsf jawan arrested for sharing information with pakistani isi agent
First published on: 04-11-2018 at 19:47 IST