News Flash

धक्कादायक! अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

गाधीजींच्या स्मृतीदिनीच ही बाब समोर आल्याने खळबळ

अमेरिका : कॅलिफोर्निया राज्यातील एका पार्कमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज (३० जानेवारी) स्मृतीदिनानिमित्त जगभरातून अभिवादन केलं जात असताना, त्यांच्या कार्याला उजाळा दिला जात असतानाच अमेरिकेतून मात्र खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी या प्रकाराची कडक शब्दांत निंदा केली असून द्वेष भावनेने करण्यात आलेल्या या गुन्ह्याची स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ब्रॉन्झ धातूमध्ये बनवलेल्या गांधीजींच्या या सहा फुटी पुतळ्याचे वजन ६५० पौंड (२९४ किलो) असून उत्तर कॅलिफोर्निया राज्यातील दाविस शहरातील सेंट्रल पार्कमध्ये तो बसवण्यात आला होता. अज्ञात समाजकंटकांनी या पुतळ्याची तोडफोड केली असून २७ जानेवारी रोजी तो सकाळी जमिनीवर तुटलेल्या अवस्थेत पडलेला पार्कच्या एका कर्मचाऱ्याच्या आढळून आला. येथील स्थानिक वृत्तपत्र डेविस एन्टप्राईजने सर्वप्रथम याबाबत वृत्त दिलं होतं. या वृत्ताची दखल नंतर भारतीय माध्यमांनी घेतली.

मोडतोड झालेला पुतळा संबंधित ठिकाणाहून हटवण्यात आला असून एका सुरक्षित जागी ठेवण्यात आला आहे. दाविस शहराचे काउन्सिलमॅन लुकास फ्रेरिक्स यांनी याबाबत माहिती दिली. पुतळ्याची केव्हा आणि कोणत्या कारणासाठी तोडफोड झाली याचा तपास केला जात आहे. तसेच ही बाब आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली असल्याचे डेव्हिसच्या पोलीस विभागाचे उपप्रमुख पॉल डॉरोशोव्ह यांनी सांगितलं आहे.

महात्मा गांधींचा हा पुतळा भारत सरकारने दाविस शहराला भेट दिला होता. स्थानिक महापालिकेने तो चार वर्षांपूर्व येथील सेन्ट्रल पार्कमध्ये बसवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 2:24 pm

Web Title: mahatma gandhi statue vandalised in us aau 85
Next Stories
1 दिल्लीतील स्फोटामागे जैश उल हिंद; संघटनेनं घेतली जबाबदारी
2 ‘दीप सिद्धू विरोधात बोललीस तर’…प्रसिद्ध अभिनेत्रीला धमकी
3 ‘हा’, दहशतवादी हल्लाच, इस्रायलचे भारतातील राजदूत म्हणाले…
Just Now!
X