News Flash

ब्रिटनमध्ये गांधीजींच्या चरख्याचा एक कोटीमध्ये लिलाव!

महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाच्या वेळी पुण्यातील येरवडा तुरूंगात असताना वापरलेल्या चरख्याचा ब्रिटनमध्ये लिलाव झाला.

| November 6, 2013 12:01 pm

महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाच्या वेळी पुण्यातील येरवडा तुरूंगात असताना वापरलेल्या चरख्याचा ब्रिटनमध्ये लिलाव झाला. हा चरखा एक लाख दहा हजार पौंड (एक कोटी आठ लाख रूपये) विकला गेला. त्याचबरोबर गांधीजींच्या शेवटच्या इच्छापत्राचाही वीस हजार पौंड किंमतीत लिलाव करण्यात आला. गुजराती भाषेतील हे इच्छापत्र त्यांनी साबरमती आश्रमात लिहिले होते.
महात्मा गांधी यांनी हा चरखा त्यावेळी ‘अमेरिकी मिशनरी रेव्हरंड फ्लॉईड’ ए.पफर यांना भेट म्हणून दिला होता. ऐतिहासिक कागदपत्रे आणि वस्तू यांच्या ‘मुलॉक ऑक्शन हाऊस’ या संस्थेने घेतलेल्या या लिलावात या चरख्याला ६० हजार पौंड इतकी किंमत मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्याहीपेक्षा साधारणपणे दुप्पट किंमत चरख्याला मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 12:01 pm

Web Title: mahatmas charkha fetches 110000 pounds at auction in uk
टॅग : Mahatma Gandhi
Next Stories
1 पाटणा स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन नाही? वेगळ्या शक्यतांवर पोलीस तपास
2 ‘निवडणुकीनंतर मोदींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून डच्चू मिळण्याची शक्यता’
3 सुमंगळ