सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक सघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गलवाण खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूवरून तृणमूलच्या खासदार महुओ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा- पंतप्रधान का शांत आहेत, आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? – राहुल गांधी

दरम्यान, या संघर्षात शहीद झालेल्या जवानांच्या मुद्द्यावरून महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. खासदार मोईत्रा यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “अविश्वसनीय आहे. सर्जिकल स्ट्राईकचा प्रत्यक्ष पुरावा आम्हाला कधीच दिसला नाही, त्या सर्जिकल स्ट्राईकचे ढोल बडवून भाजपानं २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं विजय कसा मिळवला. आता शहीद झालेल्या २० सैनिकांचे चेहरे आपल्याकडे पाहत आहेत, पंतप्रधान गप्प आहेत,” असं खासदार मोईत्रा यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- बदला घ्या, बलिदान वाया जाता कामा नये – असदुद्दिन ओवेसी

आणखी वाचा- “लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत”

सीमेवर झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. “पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?,” असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.