News Flash

गांधीजींनाही ‘चौकीदार’ अभिप्रेत!

‘मैं भी चौकीदार’ मोहिमेंतर्गत देशभरात ५०० ठिकाणी संवाद

नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेंतर्गत देशभरात ५०० ठिकाणी संवाद

आमची चौकीदार ही संकल्पना महात्मा गांधी यांच्या विश्वस्तवृत्ती या संकल्पनेची प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या शब्दाचा संकुचित अर्थ काढू नका, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेंतर्गत तालकोटरा स्टेडियम येथील सभागृहातून देशभरातील ५०० ठिकाणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारा संवाद साधला.

राफेलप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी मोहीम रावबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘चौकीदार म्हणून मी जबाबदारी पार पाडत आहे. मात्र काही लोकांच्या मनात चौकीदाराची प्रतिमा संकुचित आहे,’ असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल यांना लगावला.

देशाला राजा, महाराजांची गरज नाही, तर विश्वस्तवृत्तीने काम करणाऱ्यांची गरज आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. आपल्यावर टीका करण्याच्या नादात काही जण पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

‘बालाकोटमधील हवाई कारवाईनंतर पाकिस्तानची कोंडी झाली’ असे मोदी म्हणाले. भारत-पाकिस्तानच्या संघर्षांबाबत वेळ घालविण्यापेक्षा देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. पाकिस्तानला त्यांच्या कृत्याची फळे भोगावी लागतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका

अनेक राजकीय पक्ष खोटी आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्याच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केले. जे पक्ष आश्वासन देत आहेत ते बारकाईने तपासा, अशी सूचना मोदींनी केली. काँग्रेसने वर्षांला ७२ हजार रुपये देण्याबाबत जाहीर केलेल्या किमान उत्पन्न हमी योजनेच्या घोषणेकडे त्यांचा रोख होता. खोटे बोलणे काँग्रेसची नेहमीच सवय आहे. दिल्लीत निवडणूक होती तेव्हा असहिष्णुतेचा मुद्दा तर बिहारमधील निवडणुकीवेळी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी पुढे आणला, असेही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 12:19 am

Web Title: main bhi chowkidar campaign by bjp
Next Stories
1 आपले हेलिकॉप्टर आपणच पाडले?
2 बंगालमधील १९४३ च्या भीषण दुष्काळास चर्चिल यांची धोरणेच कारणीभूत
3 पॅन कार्ड आधारला जोडण्याची मुदत सरकारने वाढवली
Just Now!
X