24 October 2020

News Flash

गोवा : नौदलाच्या सतर्कतेमुळे प्रवासी विमान कोसळण्यापासून वाचले!

स्पाइसजेटचे प्रवासी विमान या संभाव्य अपघातातून बचावले आहे.

संग्रहित छायाचित्र

नौदलाच्या सतर्कतेमुळे गोव्याच्या विमानतळावर मोठा विमान अपघात टळला आहे. स्पाइसजेटचे प्रवासी विमान यातून बचावले आहे. नौदल बेस हंसाच्या आखत्यारितील गोव्याच्या दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना होता होता टळली. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे.

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, या विमानतळावर सुरतहून येणारे स्पाइसजेटचे SG 3568 हे प्रवासी विमान उतरणार होते. त्याक्षणी या विमानाचे नोझ लँडिंग गिअर पूर्णपणे उघडले नसल्याचे नियंत्रण कक्षाच्या लक्षात आले. त्यानतंर रनवे नियंत्रकाने तत्काळ एअर नियंत्रकाला विमान न उतरवण्याची सुचना दिली. त्यानंतर पायलट्सच्या टीमने या विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी तयारी केली. दोन वेळेला विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, ते शक्य होत नव्हते. अखेर तिसऱ्या वेळेला ते सुरक्षितरित्या धावपट्टीवर उतरवण्यास यश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 8:05 pm

Web Title: major accident averted at goa airport spicejet flight asked to abort landing by navy aau 85
Next Stories
1 #CAA: मद्रास विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आदोलन सुरु असताना घुसले पोलीस
2 Railway Recruitment: जानेवारी २०२० मध्ये जाहीर होणार परीक्षांचे निकाल
3 #CAA : तुम्ही कितीही विरोध करा, कायद्याची अंमलबजावणी होणारच – अमित शाह
Just Now!
X