19 September 2020

News Flash

हिजबूलच्या दहशतवाद्याला पुलवामा जिल्ह्य़ातून अटक

पंडित याने शरणागती पत्करली असे पुलवामा जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले

| May 29, 2016 12:34 am

दहशतवादी गटांचा पोस्टर बॉय बुरहान वणी याचा निकटचा साथीदार असलेला हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तारिक पंडित शनिवारी पुलवामा येथे पोलिसांना शरण आला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
तारिक पंडित हा अ वर्गवारीतील दहशतवादी होता आणि बुरहान याच्यासमवेत त्याची छबी पोस्टर्स आणि व्हिडीओद्वारे अनेकदा प्रसारित करण्यात आली होती. पंडित याच्याबद्दल माहिती देणाऱ्यासाठी तीन लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
पंडित याने शरणागती पत्करली असे पुलवामा जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी त्याला पकडण्यात आल्याचा दावा लष्कराने केला आहे.
पुलवामात लष्करासमोर शरणागती पत्करल्यानंतर पंडित याला अटक करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर सुनियोजित कारवाईत पंडित याला अटक केल्याने बंदी घालण्यात आलेल्या हिजबूल मुजाहिद्दीनला चांगला तडाखा बसला आहे, असे लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पुलवामातील नेवा-पिंगलाना रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
हिजबूलच्या दहशतवाद्यांबाबत पक्की खबर मिळाल्याने करीमाबाद येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी टप्प्यात येताच राष्ट्रीय रायफल बटालियनने त्याला पकडले. जिल्ह्य़ातील अनेक दहशतवादी प्रकारांमध्ये पंडित याचा हात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:34 am

Web Title: major blow to hizbuls wani key aide is held
Next Stories
1 अमेरिकेत शिकायला गेलेला आंध्रचा विद्यार्थी ‘आयसिस’च्या दृश्यचित्रफितीत
2 संयुक्त राष्ट्रांत योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव करणार
3 येमेनमध्ये ‘आयसिस’शी संबंधित सात संशयितांना अटक
Just Now!
X