पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशात हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे.
जखमींना जवळच्या लेडी रिंडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सात मृतदेह आणि ७० जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. जखमींवर तात्काळ उपचार दिली जात असून रुग्णालयाचे संचालक स्वत: आपातकालीन विभागात हजर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसाठी एमर्जन्सी जाहीर करण्यात आली असल्याचं ते म्हणाले आहेत.
An explosion has been reported at a seminary in Peshawar’s Dir Colony, Senior Superintendent of Police (Operations) Mansoor Aman has confirmed.https://t.co/26cxicX4Wf
— Dawn.com (@dawn_com) October 27, 2020
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 10:28 am