भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरारावर नेमण्यात आलेल्या नव्या संपर्क गटाची बठक डिसेंबरमध्ये होत असून आण्विक दायित्वाच्या मुद्यावर त्यात भर दिला जाणार आहे. असे असले तरी अमेरिकेकडून अणुकरारात अनेक अडथळे आणले जाण्याची भीती आहे.
अमेरिका आता द्विपक्षीय सुरक्षा मानकांची मागणी करीत असून अणुकराराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी हा आग्रह धरला आहे. खरेतर अण्वस्त्र प्रसारबंदीच्या स्वरूपात त्यातील अनेक आश्वासने भारताने दिलेली आहेत. भारत व अमेरिका यांना अजून हा अणुकरार कार्यान्वित करण्यासाठी अनेक प्रशासकीय उपाययोजना करण्याचे बाकी आहे. ओबामा व मोदी यांच्या शिखर बठकीनंतरही करारातील अडथळे दूर करण्यास अमेरिकी व्यवस्था राजी नाही.