पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान रेल्वेचा मोठा अपघात घडला. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. रावण दहानाच्या कार्यक्रमावेळी फटाक्याच्या आवाजामुळे रेल्वेचे हॉर्न न ऐकू आले नसल्याचे म्हटले जातेय. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, रेल्वे वेगाने येत होती, त्यावेळीच फटाक्याचा स्फोट झाला. लोक सैरवर धावत होते. त्याचवेळी रेल्वेने लोकांना उडवले.

‘ही दुर्घटना रोखता येऊ शकली असती, अशामध्ये या अपघातामध्ये रेल्वे किती दोषी आहे ते अहवाल आल्यानंतर समजेल. पण गेल्या काही दिवसांपासून झालेल्या रेल्वे अपघातावर नजर टाकल्यास असे जाणवेल की सतत अपघात होत आहेत मात्र रेल्वे मंत्रालयाकडून कोणतही कडक पावले उचलली जात नाहीत. सतत होणाऱ्या रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कडक पावले उचलायला हवीत.’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे.

मागील तीन वर्षांमध्ये भारतीय रेल्वेला अपघाताला सतत सामोरं जावं लागले आहे. तरीही रेल्वेने ठोस पावले उचलली नाहीत. जाणून घेऊयात गेल्या तीन वर्षात घडलेले रेल्वे अपघात…

  • ६ मे २०१८ : हावडा-मुंबई मेलला तलनी आणि धामनगांवमध्ये अपघात झाला होता. या अपघातामध्ये सहाय्यक मोटरमनचा मृत्यू झाला होता. तर एक मोटरमन जखमी झाला होता.
  • १३ मे २०१८ : पटनावरुन फैजाबाद मार्गे लखनऊला येणारी पटना-कोटा एक्स्प्रेसला अपघात झाला होता. रात्री उशीरा बाराबंकीच्या पटरंगा रेल्वे स्टेशनजवळ एक्स्प्रेस रुळावरुन खाली उतरली. बाराबंकी अपघाताच्या आदल्या दिवशी दरियाबाद रेल्वे स्टेशनजवळ वादळामुळे झाड इंजिनवर पडून इंजिन रुळावरुन घसरले होते.
  • एप्रिल २०१८ : उत्तरप्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातामध्ये १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते.
  • १० ऑक्टोबर २०१८ : न्यू फारका एक्सप्रेसचा रायबरेलीजवळ रूळावरू डब्बा घसरल्यामुळे अपघात झाला होता. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजन जखमी होता.
  • २१ जानेवारी २०१७ : कुनेरूजवळ जगदलपुर-भुवनेश्वर हीराखंड एक्सप्रेस रेल्वे रूळावरून उतरली होता. यामध्ये ४० पेक्षा आधीक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर ६८ जखमी झाले होते.
  • ७ मार्च २०१७ : मध्ये प्रदेशमधील जबरी रेल्वे स्टेशनजवळ भोपाल-उज्जैन पॅसेंजरमध्ये बॉम्बस्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये १० जण जखमी झाले होते.
  • ३० मार्च २०१७ : उत्तर प्रदेशमध्ये महाकौशल एक्सप्रेस रेल्वे रूळावरून उतरली होती. या अपघातामध्ये ५० जण जखमी झाले होते.
  • १५ एप्रील २०१७ : मेरठ-लखनऊ राज्यरानी एक्सप्रेसच्या ८ बोगी रूळावरून घसरल्या होत्या. यामध्य१० प्रवाशी जखमी झाले होते.
  • १९ ऑगस्ट २०१७ : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये कलिंग-उत्कल एक्सप्रेसला मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला होता तर ४० जखमी होते.
  • २३ ऑगस्ट २०१७ : पाटना आणि अचलदा रेल्वे स्टेशन दरम्यान गाडी रूळावरून उतरली होता. यामधे १०० जण जखमी झाले होते.
  • २४ नोव्हेंबर २०१७ : वास्को दा गामा-पाटना एक्सप्रेसला उत्तर प्रदेशमजवळी चित्रकूट जवळ अपघात झाला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर ९ जखमी झाले होते.
  • ६ सप्टेंबर २०१७ : हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसला अपघात झाला. शक्तीपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे रुळावरुन घसरले होते. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले होते.
  • २४ नोव्हेंबर २०१७ : कोळसा घेऊन जाणाऱ्या पारादिप-कटक मालगाडीचा गोरखनाथ-रधुनाथपूरदरम्यान अपघात झाला.
  • १ मे २०१६ : फैजाबाद-दिल्ली एक्सप्रेस हापुडजवळ रेल्वे रूळावरून उतरली होती. मोटरमनच्या प्रसंगवधानमुळे मोठी हानी टळली होता.
  • ६ मे २०१६ : चेन्नई सेंट्रल-तिरुवनंतपूरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसची दुसऱ्या रेल्वेला टक्कर. यामध्ये ७ जण जखमी झाले होते.
  • २० नोव्हेंबर २०१६ : कानपूरच्या देहातजवळ इंदौर- पटना एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये १५० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा अपघात घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
  • २८ डिसेंबर २०१६ रोजी कानपूरच्या रुरा रेल्वे स्टेशनजवळ सियालदह-अजमेर एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये १०० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते.
  • २८ डिसेंबर २०१६ : कानपूरजवळील अजमेर-सियालदाह एक्सप्रेसच्या १५ बोगी रूळावरून उतरल्या होत्या. यामध्ये ४० जखमी झाले.
  • २० मार्च २०१५ : रायबरेलीच्या बथरांवाजवळ जनता एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. या अपघातामध्ये ३२ प्रवाशांचा मृत्यू जाला होता. तर १५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते.
  • २६ मे २०१४ : उत्तरप्रदेशच्या संतकबीरनगर येथे गोरखधाम एक्स्प्रेसने उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. या अपघातामध्ये २४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.