26 October 2020

News Flash

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय जेडीयूत दाखल

मालेगाव स्फोटप्रकरणी एटीएसने साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली होती.

रमेश उपाध्याय

सन २००८ मध्ये देशात खळबळ उडवणाऱ्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील एक आरोपी सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षात प्रवेश केला आहे. जेडीयूत त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या माजी सैनिकांच्या सेलचे राज्य संयोजक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे जेडीयू प्रमुख अनुपसिंह पटेल यांनी १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे नियुक्ती पत्र जाहीर केले.

मालेगाव बॉम्बस्फोटात कथीत सहभागासाठी महाराष्ट्र एटीएसने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासह सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. त्यानंतर सन २०१७ मध्ये त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या एका विशेष एनआयए कोर्टाने त्यांची सुनावणी सुरु आहे.

उपाध्याय पुण्याचे रहिवासी आहेत मात्र, त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलिया या ठिकाणी झाला. याच ठिकाणाहून त्यांनी अपक्ष म्हणून २०१९ ची लोकसभा निवडणुकही लढवली होती. यापूर्वी त्यांनी २०१२ मध्ये हिंदू महासभेच्या तिकीटावर बलिया जिल्ह्यातील बैरिया येथून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उपाध्याय म्हणाले, “उत्तर प्रदेशात जेडीयूच्या सदस्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. चर्चेनंतर मी जेडीयूसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. माझा निवडणूक लढवण्याचा विचार नाही. मी सध्या पुण्यात राहत असलो तरी पक्षाच्या कामासाठी उत्तर प्रदेशचे दौरे करणार आहे. जेडीयूचे नेतृत्व आणि त्यांचा सामाजिक न्यायासह विकासाच्या विचारावर माझा विश्वास आहे.” आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारल्यानंतर उपाध्याय म्हणाले, “मी निर्देष आहे. मी राष्ट्रवादी, देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खोट्या आरोपांखाली गोवण्यात आलं. मी माझ्या सुटकेची वाट पाहत आहे. मी समाजासाठी काम करु इच्छितो. जेडीयू इमानदारीने गरीब आणि दलितांच्या विकासासाठी काम करीत आहे.”

आणखी वाचा- Bihar Elections: मतांच्या टक्केवारीत भाजपाची जोरदार मुसंडी; ठरला एकमेव राष्ट्रीय पक्ष

उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत जेडीयूचे सरचिटणीस हरिशंकर पटेल म्हणाले, “मेजर उपाध्याय यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशातून निवडणूक लढले आहेत. बलियाहून आमचे जिल्हा प्रमुख उपाध्याय यांना ओळखत होते. त्यांनी उपाध्याय यांना जेडीयूत सहभागी होण्याबाबत विचारले. आम्ही कोर्टाचा आणि कायद्याचा सन्मान करतो. उपाध्याय यांना कोर्टाने दोषी ठरवलेलं नाही.”

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आणखी एक आरोपी साधी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपाने २०१९च्या निवडणुकीत भोपाळमधून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. त्या तिथून निवडून आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:28 pm

Web Title: major ramesh upadhyay accused in malegaon bomb blast enters in jdu aau 85
Next Stories
1 “भारतातील गरीब भुकेला आहे कारण…,” राहुल गांधींनी मोदी सरकारवर साधला निशाणा
2 शबरीमला मंदिर भाविकांसाठी खुलं, दिवसाला २५० भक्तांना प्रवेश; जाणून घ्या काय आहेत अटी…
3 Coronavirus : २४ तासांत ८३७ मृत्यू; ६२,२१२ नवीन बाधितांची भर
Just Now!
X