केंद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत.

सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अंबू हे ३१ डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रावत हे ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत

लेफ्टनंट जनरल नरवणे हे मूळ पुण्याचे असून  जून १९८० रोजी ते लष्कराच्या ७व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केले आहे..