News Flash

Barak Obama : बराक ओबामा परत या; अमेरिकेतील सर्वेक्षणाचा निष्कर्ष

एखादा नेता निवडून आल्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावर असतो

Barack Obama : ट्रम्प यांनी स्थलांतरितांसदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दलही जनतेने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ४७ टक्के लोकांनी या निर्णयाच्या बाजूने तर ४९ टक्के लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन दोन आठवडे उलट नाही तोच आता अमेरिकी नागरिकांमधून ‘बराक ओबामा परत या’, अशा धाटणीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये बहुतांश लोकांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून काढून टाकावे, असे म्हटले आहे. ५२ टक्के लोकांनी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असतानाचा काळ अधिक चांगला होता असे म्हटले असून ४३ टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या निवडीवर आनंद व्यक्त केला आहे. साधारणत: एखादा नेता निवडून आल्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावर असतो. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्विकारल्यानंतर काही काळातच जनता बराक ओबामा यांना परत आणावे, अशी भाषा करत आहे. यानिमित्ताने ट्रम्प यांनी पुन्हा नवा इतिहास रचला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया ‘पब्लिक पॉलिसी पोलिंग’चे अध्यक्ष डीब डेबनाम यांनी व्यक्त केली.

हे सर्वेक्षण सुरू असताना ट्रम्प यांना विरोध करणाऱ्यांचे प्रमाण ३५ टक्के होते. मात्र, गेल्या आठवडाभरात हे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढून ४० टक्क्यांवर पोहचले आहे. केवळ ४८ टक्के लोकांनीच ट्रम्प यांच्या गच्छंतीला विरोध दर्शविला आहे. याशिवाय, ट्रम्प यांनी स्थलांतरितांसदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दलही जनतेने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ४७ टक्के लोकांनी या निर्णयाच्या बाजूने तर ४९ टक्के लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, सर्वसाधारण विचार करता बहुतांश नागरिकांनी या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम बहुल देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात अमेरिकेतील जनता उत्स्फूर्तपणे निदर्शने करीत आहे. या विरोधकांची माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पाठराखण केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लीम बहुल देशातील लोकांना तसेच जगभरातून कुठूनही अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांना बंदी घातली आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात ही कौतुकास्पद बाब असल्याचे बराक ओबामांनी म्हटले. राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतर प्रथमच बराक ओबामा यांनी राजकीय स्थितीवर काही वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्याच नव्हे तर कोणत्याही निर्णयाविरोधात शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाचा अवलंब करुन विरोध करणे हा तुमचा अधिकार आहे असे ओबामा यांनी सांगितले होते. जेव्हा अमेरिकेच्या मूल्यांचा ऱ्हास होणारी परिस्थिती निर्माण होईल असे दिसेल त्यावेळी आपणही त्या विरोधात बोलू असे ओबामा यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 5:08 pm

Web Title: majority of americans want barack obama back as president poll
Next Stories
1 पॅरिसमध्ये लुव्र संग्रहालयाजवळ जवानावर चाकूहल्ला
2 नोटाबंदी, कठोर नियमांमुळे सोन्याची झळाळी उतरली; मागणीत मोठी घट
3 E Ahameds Death: ई अहमद यांच्या मृत्यूची चौकशी करा, संसदेत विरोधकांची मागणी
Just Now!
X