काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपावासी झाल्याने कमलनाथ सरकारमधील त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर या सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. आमदारांकडून हात उंचावून ही चाचणी घ्यावी असे, आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्राद्वारे दिले आहेत.

मुख्यमंत्री कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी म्हटले की, “भाजपाने त्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, विधानसभेत इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली उपलब्ध नाही.” त्यामुळे आमदारांचे हात उंचावून बहुमत चाचणी घेण्याच्या पद्धती वापरण्याचा सल्ला राज्यापालांनी दिला आहे.